विरोधकांकडून सुपारी घेऊन काम; प्रसंगी जनताच त्यांना धडा शिकवेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 07:52 PM2021-09-27T19:52:45+5:302021-09-27T19:57:10+5:30
महाराष्ट्रातील जनतेला सारे समजत आहे.
औरंगाबाद : महाराष्ट्रातील जनतेला सारे समजत आहे. विरोधकाकडून सुपारी घेऊन काम केले जात आहे, पण प्रसंग येईल तेव्हा हीच जनता त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असे मत पुनर्वसन व ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी व्यक्त केले. ‘महाज्योती’च्या मराठवाडा विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
आनंद अडसूळ यांच्यावरील ईडीच्या चौकशीच्या अनुषंगाने ते म्हणाले, रवि राणा यांनी बदल्यांच्या भावनेतून अडसूळ यांच्यावर आरोप केलेले आहेत. पूर्वी सूडबुद्धीने कधी राजकारण होत नव्हते. विचारांची लढाई असायची. सरकार विरोधकांच्या आरोपांपुढे हतबल झाले आहे का, या प्रश्नाच्या उत्तरात वडेट्टीवार म्हणाले, अनिल परबांनी दावा ठोकला आहे. संजय राऊत यांनीही चंद्रकांत पाटील यांच्यावर दावा ठोकला आहे. महाराष्ट्रातील जनतेला सारे समजत आहे. आता जनताचा त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.
निजामाच्या विचारांचे लोक निवडून येतात हे मराठवाड्याचे दुर्दैव
महाज्योतीच्या योजना अत्यंत उपयुक्त असून, त्यातून मराठवाड्याचा नोकऱ्यांमधील टक्का वाढल्याशिवाय राहणार नाही, असा दावा वडेट्टीवार यांनी केला. ग्रामपंचायतींच्या दर्शनी भागात महाज्योतीच्या योजनांची माहिती दिली जावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
माणुसकीला सलाम ! लोकवर्गणीच्या पाठिंब्यातून ड्रायव्हरचा मुलगा झाला लंडनमध्ये पदवीधर