मराठवाड्यातील उद्योगांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 12:15 AM2018-01-09T00:15:45+5:302018-01-09T00:15:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : मुंबईत १८ ते २४ फेबु्रवारीदरम्यान होणा-या मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स-२०१८ मध्ये औरंगाबादसह मराठवाड्यातील उद्योगांना क्षमता ...

Opportunities for Marathwada Industries | मराठवाड्यातील उद्योगांना संधी

मराठवाड्यातील उद्योगांना संधी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मुंबईत १८ ते २४ फेबु्रवारीदरम्यान होणा-या मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स-२०१८ मध्ये औरंगाबादसह मराठवाड्यातील उद्योगांना क्षमता दाखविण्याची संधी मिळणार आहे. सोबतच स्टार्टअपला चालना देण्यासाठी आयोजित स्पर्धेतून बक्षिसे जिंकण्याची संधी ३० वर्षे वयांच्या खालील उद्योजकांना मिळणार आहे.
आॅटो, फार्मा, अ‍ॅग्रो, स्टील आदी उद्योगांसाठी असलेल्या इको सिस्टीमची माहिती देण्यासाठी ‘थीम बेस्ड प्रदर्शनह्ण वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई येथे भरविण्यात येणार आहे. प्रदर्शनाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी सोहम वायाळ, सीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ, वसंत वाघमारे, मसिआचे अध्यक्ष सुनील किर्दक, आशिष गर्दे आदींची उपस्थिती
होती.
या दरम्यान ‘बिझनेस टू बिझनेसह्ण आणि ‘बिझनेस टू गव्हर्नमेंट’ ही चर्चा होणार असून, नव्या उद्योगांना येथे आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहते. यासाठी मराठवाड्यातील सर्वच औद्योगिक संघटना एकत्र काम करणार आहेत. त्या अनुषंगाने उद्योग संघटना आणि उद्योजकांची एकत्रित बैठक सोमवारी विभागीय कार्यालयात पार पडली.
स्टार्टअपला चालना देण्यासाठी एक स्पर्धा यानिमित्ताने घेण्यात येणार आहे. त्यासाठी ३० वर्षांखालील उद्योजक युवक सहभागी होऊ शकतात. त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आपल्या प्रकल्पाचे सादरीकरण करावे लागेल आणि त्यातून बक्षीस काढले जाईल. पहिले बक्षीस ५० लाख, दुसरे बक्षीस ३० लाख आणि तृतीय बक्षीस हे २० लाख रुपये देण्यात येणार आहे. मराठवाड्यातून एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी सोहम वायाळ आणि सीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ हे समन्वयक म्हणून या कन्व्हर्जन्ससाठी काम पाहत आहेत.

Web Title: Opportunities for Marathwada Industries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.