‘सुन रहा है’फेम अंकितला ऐकण्याची संधी
By Admin | Published: October 5, 2014 12:12 AM2014-10-05T00:12:14+5:302014-10-05T00:50:33+5:30
औरंगाबाद : ‘लोकमत’ आणि प्रोझोन मॉलच्या संयुक्त विद्यमाने गायक अंकित तिवारीला ऐकण्याची संधी दि.८ आॅक्टोबर रोजी प्रोझोन मॉल येथे मिळणार आहे.
औरंगाबाद : प्रोझोन मॉलच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त ‘लोकमत’ आणि प्रोझोन मॉलच्या संयुक्त विद्यमाने ‘सुन रहा है ना तू’ आणि ‘तेरी गलियाँ’ गाण्याचा गायक अंकित तिवारीला ऐकण्याची संधी बुधवार, दि.८ आॅक्टोबर रोजी प्रोझोन मॉल येथे मिळणार आहे.
या कार्यक्रमाचे मोफत पास लोकमत सखी मंच, युवा नेक्स्ट आणि कॅम्पस क्लबच्या सदस्यांना ५ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान लोकमत भवन येथे मिळणार आहेत. पास मर्यादित उपलब्ध असल्यामुळे प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य या तत्त्वावर पास वाटप करण्यात येणार आहेत. एका पासवर एका सदस्याला प्रवेश देण्यात येणार आहे. सदस्यांनी सोबत ओळखपत्र आणणे आवश्यक आहे.
ग्राहकांमुळेच आम्ही यशस्वी
प्रोझोनच्या वर्धापन दिनानिमित्त मॉलचे संचालक अनिल इरावने यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, स्मार्ट सिटी म्हणून ज्या शहराची ओळख होत आहे, त्यामध्ये औरंगाबादचा समावेश असल्यामुळे शहरात नवीन काम करण्याची इच्छा होती. त्यामुळे शहराची प्रोझॉन मॉल बांधण्यासाठी निवड केली. मराठवाड्यातील ग्राहकांच्या सहकार्यामुळे आम्ही यशस्वी झालो,
राज्यातील मोठ्या मॉलपैकी एक असलेल्या प्रोझोन मॉलला ८ आॅक्टोबर रोजी चार वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या चार वर्षांपासून आम्ही मराठवाड्यातील शहरी आणि ग्रामीण भागामधील ग्राहकांना यशस्वी सेवा देत आहोत. ग्राहकांना एकाच ठिकाणी सर्व काही खरेदी करण्याची संधी प्रथम मिळवून दिली. ग्रामीण भागातील ग्राहक शहरात आल्यानंतर प्रोझोनला नक्कीच भेट देतो. सर्व वर्गांमधील ग्राहकांना विविध वस्तू खरेदी करण्याची संधी येथे उपलब्ध करण्यात आलेली आहे.
मॉलमध्ये विविध क्षेत्रांतील विविध नामांकित कंपन्यांचे ब्रँड आहेत. सरल बाजारमध्ये १९० दुकाने आणि प्रोझोन ट्रेड सेंटर लवकरच सुरू करण्यात येणार आहे. ग्राहकांना खरेदीसोबत मनोरंजन व्हावे यासाठी आम्ही विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतो. मॉलच्या माध्यमातून दोन हजार जणांना रोजगार मिळाला आहे.
महिन्याला ६ लाख ग्राहकांची भेट
सुरक्षा, सेवा, गुणवत्ता आणि पार्किंगची प्रशस्त व्यवस्था असल्यामुळे संपूर्ण मराठवाड्यातून ग्राहक येथे येतात. प्रोझोन मॉलमध्ये महिन्याला सहा लाख ग्राहक भेट देत आहेत.
या कार्यक्रमाचे मोफत पास लोकमत सखी मंच, युवा नेक्स्ट आणि कॅम्पस क्लबच्या सदस्यांना ५ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान लोकमत भवन येथे मिळणार आहेत.