मनपात नवीन चेहऱ्यांना संधी
By Admin | Published: July 15, 2017 12:23 AM2017-07-15T00:23:18+5:302017-07-15T00:25:54+5:30
नांदेड: युवक काँग्रेसचे काम कौतुकास्पद असून येणाऱ्या काळात महापालिका व पुढील निवडणुकांमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल,
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: युवक काँग्रेसचे काम कौतुकास्पद असून येणाऱ्या काळात महापालिका व पुढील निवडणुकांमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल, परंतु त्यासाठी त्यांचे कार्य आणि जनसंपर्क महत्त्वाचा आहे़ उमेदवारी कुणाला मिळेल यापेक्षा आपण काँग्रेससाठी काम करणार ही भावना ठेवून कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनी केले़
दिवंगत डॉ़ शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त नांदेड लोकसभा युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित महारक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी आ़ वसंतराव चव्हाण तर आ़ अमरनाथ राजूरकर, आ़डी़पी़ सावंत, माजी आ़हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, जिल्हा प्रभारी सिद्धार्थ हत्तीअंबिरे, माजी आ़ रोहिदास चव्हाण, संजय लहानकर, किशोर स्वामी, सभापती शीला निखाते, विलास धबाले, विनय पाटील गिरडे, श्याम दरक, संयोजक तथा युवकचे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील कोंढेकर, रवींद्र पाटील चव्हाण, आनंद चव्हाण, बालाजी सूर्यवंशी तळणीकर, बाबूराव कोंढेकर, व्यंकटेश जिंदम, संतोष मुळे आदींची उपस्थिती होती़
खा. चव्हाण म्हणाले, शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त मागील नऊ वर्षांपासून रक्तदान शिबीर घेण्यात येते़ युवक काँग्रेस राबवीत असलेला हा सामाजिक उपक्रम स्वागतार्ह असून त्यामुळे हजारो जणांना जीवनदान मिळते़ युवकांनी अशाच प्रकारचे कार्य करून जनतेचा विश्वास संपादन केला पाहिजे़ येणाऱ्या निवडणुकांमध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल़
सध्याचे भाजपा सरकार अपयशी ठरले असून त्यांनी जनतेचा विश्वासघात केल्याची टीका खा़चव्हाण यांनी केली़ दरम्यान, आ़अमरनाथ राजूरकर, माजी आ. रोहिदास चव्हाण, हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी मनोगत व्यक्त केले़ प्रास्ताविकात पप्पू पाटील कोंढेकर यांनी युवक काँग्रेसच्या कार्याचा आढावा घेतला़ तसेच आगामी महापालिकेत युवकच्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची मागणी केली़
यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष महेश देशमुख तरोडेकर, उत्तर विधानसभा अध्यक्ष विठ्ठल पावडे, अब्दुल गफार, माधव कदम, जनार्दन बिरादार, रूपेश यादव, रहीम खान, भालचंद्र पवळे, किशन कल्याणकर, बालाजी जाधव, शिवहरी गाढे, प्रशांत चालिकवार, उमेश सरोदे, गोपी मुदिराज, महेश मगर, हरीश हंबर्डे, विशाल राऊतखेडकर, श्याम आढाव आदींनी परिश्रम घेले़ सूत्रसंचालन प्रा़ संतोष देवराये यांनी केले़