मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना युरोपमध्ये ‘इंटर्नशिप’ करण्याची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:02 AM2021-02-23T04:02:12+5:302021-02-23T04:02:12+5:30
देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय विविध अभिनव व उपक्रमशील प्रयोगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देत आले आहे. ...
देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय विविध अभिनव व उपक्रमशील प्रयोगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देत आले आहे. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना युरोपमध्ये ‘इंटर्नशिप’ करता यावी यासाठी जागतिक स्तरावरील जवळपास १६० देशांमध्ये ‘युथ डेव्हलपमेंट’ कार्यक्रम राबवणाऱ्या ‘एज्युकेरॉन इंटरनॅशनल’ व देविगरी अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्यात शुक्रवारी शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला. ‘सेंटर फॉर युरोपियन स्टडीज’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती व आंतरराष्ट्रीय संशोधनासाठी संधी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे महाविद्यालयाचे संचालक डॉ. उल्हास शिऊरकर यांनी सांगितले.
या सामंजस्य कराराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बाहेरील देशात शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार असून आपल्या क्षेत्रात नावीण्यपूर्ण संशोधन करून भविष्य घडू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आ.सतीश चव्हाण यांनी उद्घाटनप्रसंगी केले. यावेळी मशिप्र मंडळाचे उपाध्यक्ष शेख सलीम शेख अहमद, एज्युकेरॉन इंटरनॅशनलचे संस्थापक केरॉन वैष्णव यांची प्रमुख उपस्थिती होती. हा सामंजस्य करार करण्यासाठी डॉ. गजेंद्र गंधे, प्रा. संजय कल्याणकर यांनी परिश्रम घेतले.
विभागप्रमुख डॉ.सत्यवान धोंडगे, प्रा. प्रकाश तौर, डॉ.राजेश औटी, डॉ. सुनील शिंदे, प्रा. रूपेश रेब्बा, अच्युत भोसले आदींची यावेळी उपस्थिती होती.
फोटो कॅप्शन- ‘एज्युकेरॉन इंटरनॅशनल’ व देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्यात शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी आ. सतीश चव्हाण, शेख सलीम, डॉ. उल्हास शिऊरकर, केरॉन वैष्णव, डॉ. गजेंद्र गंधे आदी.