नोटाबंदीवरून विरोध अन् समर्थनही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 12:40 AM2017-11-09T00:40:06+5:302017-11-09T00:40:12+5:30
नोटबंदीच्या निर्णयाच्या वर्षपूर्तीच्या दिवशी त्याच्या विरोधासाठी व समर्थनासाठी दोन वेगवेगळे गट मैदानात उतरले होते. यात काँग्रेस व समाजवादी पार्टीने हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला तर रिपाइं आठवले गटाच्या वतीने या निर्णयाच्या समर्थनार्थ व्हाईट मनी डे साजरा करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : नोटबंदीच्या निर्णयाच्या वर्षपूर्तीच्या दिवशी त्याच्या विरोधासाठी व समर्थनासाठी दोन वेगवेगळे गट मैदानात उतरले होते. यात काँग्रेस व समाजवादी पार्टीने हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला तर रिपाइं आठवले गटाच्या वतीने या निर्णयाच्या समर्थनार्थ व्हाईट मनी डे साजरा करण्यात आला.
गेल्यावर्षी ८ नोव्हेंबरला नोटाबंदी झाल्यावरचे बेहाल मांडण्यासाठी काँग्रेसने काळा दिवस पाळला. तर या निर्णयाचे वर्ष श्राद्ध घातले. म.गांधी यांच्या पुतळ्यासमोर करण्यात आलेल्या या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, अॅड. बाबा नाईक, श्यामराव जगताप, रवी पाटील, धनंजय पाटील, रमेश जाधव, डॉ.सतीश पाचपुते, एल.जी.घुगे, माणिक पाटील, बापूराव बांगर, माबूद बागवान, भगवान खंदारे, श्रीराम जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. मोदी सरकार... हाय .. हाय.. अशा घोषणाही दिल्या. डिझेल, पेट्रोल दरवाढ व शेतीमालाच्या घटलेल्या दराबाबतही घोषणा देण्यात आल्या.
दरम्यान, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने नोटाबंदीचा दिवस काळा दिवस पाळून मोदी सरकारचा निषेध केला. तर यात शेतकरी, व्यापाºयांसह सर्वांनाच झटका बसल्याचे निवेदन टी.के. टापरे, मो.मुस्ताक, आर.आर. बोर्डे यांनी दिले.
रिपाइंचे समर्थन
रिपाइं आठवले गटाच्या वतीने नोटाबंदी निर्णयाच्या समर्थनार्थ गांधी चौकात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. हा दिवस व्हाईट मनी दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यात विविध प्रकारची गाणी लावण्यात आली होती. मंडप टाकून त्यात रिपाइंचे दिवाकर माने, फुलाजी शिंदे, सुरेश वाढे, मिलिंद कवाने, सुभाष ठोके, सुनील इंगोले, चंद्रकांत फुंडसे, रमेश इंगोले, श्रीरंग पंडित, गोविंद जाधव, प्रकाश वाढे, प्रकाश कांबळे, बबन कवाने, सुरेश वाठोरे, एस.एम. राऊत, शे.युनुस, पंचफुलाबाई रसाळ, शांताबाई भगत आदी उपस्थित होते.