समृद्धी महामार्गातील भूसंपादनाच्या मोबदल्यावर आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 10:58 PM2019-02-09T22:58:23+5:302019-02-09T22:58:33+5:30
समृद्धी महामार्गात गावंदारी तांडा येथील भूसंपादनाचा मोबदला देण्याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारीने आक्षेप घेण्यात आला आहे.
औरंगाबाद : समृद्धी महामार्गात गावंदारी तांडा येथील भूसंपादनाचा मोबदला देण्याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारीने आक्षेप घेण्यात आला आहे. गोरख राठोड यांनी याप्रकरणी तक्रार दिली असून, कृष्णा राठोड यांना मोबदला देण्याबाबत त्यांनी आक्षेप घेतला आहे.
गावंदरी तांडा येथील जुना गट क्र.११७ (नवीन गट क्र. ८ सर्व्हे नं. ७२) बाबत तहसीलदार यांच्याकडे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. कृष्णा राठोड यांनी गट क्र. ८ सर्व्हे नं. ७२ मधील आमची वडिलोपार्जित कुळाची जमीन खरेदी केली आहे. त्या जमिनीवर आमचा ताबा आहे. असे असताना राठोड यांनी खरेदीखतामध्ये महसूल प्रशासनाच्या मदतीने सातबाºयामध्ये फेरफार केली. यमजी राठोड यांच्या वारसांची एकप्रकारे फसवणूक झाल्याने तहसीलदारांकडे याप्रकरणी दावा दाखल केला. ते प्रकरण अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे कृष्णा राठोड यांना सदरील जमिनीबाबत कुठलाही मोबदला देण्यात येऊ नये. याप्रकरणी निकाल लागेपर्यंत मोबदला दिवाणी न्यायालयात जमा करण्यात यावा, अशी मागणी जानू राठोड यांनी उपविभागीय अधिकाºयांकडे केली आहे.