विमानतळाबाहेर आंदोलन करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांसह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 12:23 PM2024-08-25T12:23:16+5:302024-08-25T12:24:26+5:30

देशात मुली महिला सुरक्षित नसल्यामुळे व वाढत्या अत्याचारांच्या घटनांवरून विमानतळाबाहेर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने काळे कपडे घालून हातात बॅनर घेऊन  निषेध नोंदवला. 

Opposition leaders protesting outside airport along with office bearers of Mahavikas Aghadi were detained by police | विमानतळाबाहेर आंदोलन करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांसह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

विमानतळाबाहेर आंदोलन करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांसह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

छत्रपती संभाजीनगर - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगाव दौऱ्यावर असून त्यांना देशातील महिलांच्या सुरक्षेबाबत जाब विचारण्यासाठी महाविकास आघाडीने चिकलठाणा विमानतळासमोर आंदोलन केले. 

देशात मुली महिला सुरक्षित नसल्यामुळे व वाढत्या अत्याचारांच्या घटनांवरून विमानतळाबाहेर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने काळे कपडे घालून हातात बॅनर घेऊन  निषेध नोंदवला. 

अर्ध्या तासाच्या आंदोलनानंतर पोलिसांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. अंबादास दानवे, राजू वैद्य, नंदकुमार घोडेले, अभिषेक देशमुख, ख्वाजा, युसूफ खान, दिपाली मिसाळ सह पदाधिकारी-कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
 
Web Title: Opposition leaders protesting outside airport along with office bearers of Mahavikas Aghadi were detained by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.