दारू दुकानास विरोध
By Admin | Published: June 1, 2017 12:40 AM2017-06-01T00:40:11+5:302017-06-01T00:42:25+5:30
उमरगा : येथील महात्मा बसवेश्वर विद्यालय व स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यामंदिराजवळ होणाऱ्या संभाव्य दारू दुकानास परवानगी नाकारण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरगा : येथील महात्मा बसवेश्वर विद्यालय व स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यामंदिराजवळ होणाऱ्या संभाव्य दारू दुकानास परवानगी नाकारण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा शाळा व नागरिकांच्या वतीने नगरपालिकेस देण्यात आला.
यासंबंधी राष्ट्रीय शिक्षण प्रसारक संस्था, उमरगा व पतंगे रोड परिसरातील नागरिकांनी मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांना सोमवारी निवेदन दिले. यात म्हटले आहे की, पतंगे रोडवर बेकायदेशीरपणे मद्य विक्रीचे दुकान सुरू करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. ही जागा विद्यालयापासून जवळ व भरवस्तीत असल्याने अशा ठिकाणी मद्यालय सुरू करता येत नसल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
निवेदनावर राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. चंद्रकांत महाजन, अध्यक्ष मल्लिकार्जुन दंडगे, कार्यवाह डॉ. कपील महाजन, संचालक प्रा. शिवाजीराव वडणे, प्रवीण अणदूरकर, मुख्याध्यापक के. बी. पवार, सहशिक्षक संजय कोथळीकर, शिवदास कुलकर्णी, विद्यार्थिनी नीलम काळे, शिवगंगा पिटला, नागरिक एस. एस. सगर, अरविंद कांबळे, गोपीचंद चव्हाण, जब्बार बासले, गोविंद जमादार, अनंत कुलकर्णी आदींसह ५४ जणांच्या स्वाक्षरी आहेत.