राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेला विरोध; सभा उधळून लावण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 06:14 PM2022-04-18T18:14:47+5:302022-04-18T18:21:39+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे जाणीवपूर्वक प्रक्षोभक भाष्य वारंवार करून दोन समाजात तेढ निर्माण करत आहेत,असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

Opposition to Raj Thackeray's Aurangabad meeting; Warning to disrupt the meeting | राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेला विरोध; सभा उधळून लावण्याचा इशारा

राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेला विरोध; सभा उधळून लावण्याचा इशारा

googlenewsNext

औरंगाबाद : 'मशिदीवरील भोंगा हटाव' मोहीम हाती घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे रोजी शहरात सभा होणार आहे. यावरून आता राजकीय वातावरण तापत असून राज ठाकरेंची सभा होऊ देणार नसल्याचा इशारा रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे यांनी दिला आहे. प्रशासनाने परवानगी दिली तरी आम्ही सभा उधळून लावू, असा इशाराही कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे. 

जिल्हाध्यक्ष कांबळे यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटलं की, 'सध्या सर्व जाती-धर्माचे सण-उत्सव शांतता व सद्भावना कायम ठेवून साजरे केले आहेत, अशी परिस्थिती असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे जाणीवपूर्वक प्रक्षोभक भाष्य वारंवार करून दोन समाजात तेढ निर्माण करत आहेत, त्यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत असा आरोप कांबळे यांनी केला आहे. 
त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात यावी आणि त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात यावी अन्यथा संविधानिक मार्गाने जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा कांबळे यांनी दिला आहे.

राज ठाकरेंच्या २ मोठ्या घोषणा
दरम्यान, राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत २ महत्त्वाच्या घोषणा केल्या. येत्या १ मे रोजी औरंगाबाद येथे जाहीर सभा होणार आहे. तर ५ जून रोजी मनसे सहकाऱ्यांसोबत अयोध्येला जाणार, अशी घोषणा राज ठाकरेंनी केली आहे. भोंगे हटविण्याचा विषय मुस्लीम बांधवांनी धर्मावर नेऊ नये. हा सामाजिक विषय आहे. भोंग्याच्या आवाजामुळे लहान मुले, विद्यार्थी यांनाही त्रास होतो. आमच्या मिरवणुकीवर तुम्ही दगडफेक करणार असाल तर आमचेही हात बांधले नाहीत असा इशाराही राज ठाकरेंनी दिला आहे. केवळ हिंदूनाच नव्हे तर मुस्लीमांनाही आवाजाचा त्रास होत असल्याचं राज ठाकरेंनी सांगितले आहे.

Web Title: Opposition to Raj Thackeray's Aurangabad meeting; Warning to disrupt the meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.