टँकरखेपा बुडव्यांवर कारवाईचे आदेश

By Admin | Published: May 5, 2016 12:06 AM2016-05-05T00:06:27+5:302016-05-05T00:12:08+5:30

व्यंकटेश वैष्णव ल्ल बीड जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन केलेल्या टंचाई निवारण कक्षात आलेल्या तक्रारींची उशिरा का होईना जिल्हाधिकारी यांनी दखल घेत,

Order for action on tankers | टँकरखेपा बुडव्यांवर कारवाईचे आदेश

टँकरखेपा बुडव्यांवर कारवाईचे आदेश

googlenewsNext

व्यंकटेश वैष्णव ल्ल बीड
जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन केलेल्या टंचाई निवारण कक्षात आलेल्या तक्रारींची उशिरा का होईना जिल्हाधिकारी यांनी दखल घेत, टँकरच्या खेपा बुडविणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
बीड जिल्हयात प्रचंड दुष्काळ आहे. अशा स्थितीत चारा व पाण्याच्या तक्रारी वाढत आहेत. यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात (वॉर रूम) तक्रार निवारण कक्ष स्थापन केला होता. जिल्हयातून मोठ्या प्रमाणात टंचाईच्या बाबत तक्रारी येत आहेत. यातक्रारीकडे सुरूवातीलाच गांभीर्याने पाहून चारा व पाण्यांमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करणे अपेक्षीत होते. वेळीच पाणी चोरणाऱ्यांवर कारवाई केली असती तर जिल्हाप्रशासनाचा धाक राहिला असता.
यांच्यावर होणार कारवाई
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ३ मे रोजी पाणी पुरवठा विभाग, बीड व संबंधीत तहसील कार्यांलयांना दिलेल्य पत्रात म्हटले आहे की, ३० एप्रिल पर्यंत वॉर रूममध्ये फोनवरून आलेल्या तक्रारींची चौकशी करून तात्काळ कारवाई करावी, यामध्ये केज तालुक्यातील कोरड्याची वाडी, विडा वडवणी तालुक्यातील खडकी, टोपेवाडी, खंडोबाची वाडी या गु्रप ग्रामपंचायती चौकशी करून कारवाई नियमानुसार टँकरच्या खेपांची चौकशी करण्याचे आदेश संबंधीत तहसीलदार, गटविकास अधिकारी, कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभागाला जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर आता टँकर खेपा बुडव्यांवर काय व केव्हा कारवाई करतात हे पहाण्यासाठी वेळ जावा लागणार आहे. कारवायांकडे सर्वांचे लक्ष वेधले
आहे.
कुठे खेपा कमी, तर कुठे पाणीच मिळेना...तक्रारींची दखल घेण्यासही विलंब
वडवणी तालुक्यातील खडकी, टोपेवाडी, खंडोबाची वाडी या गु्रप ग्रामपंचायतींमध्ये प्रत्येक गावाला दोन खेपा असताना देखील एकच खेप दिली जात आहे. उर्वरित टँकरच्या खेपा कुठे टाकल्या जातात यांची चौकशी करा. अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केलेली आहे.
वॉररूमकडे आलेल्या तक्रारी एप्रिल महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यातील आहेत. मात्र यातक्रारींवर आता पर्यंत तरी ठोस अशी कारवाई झालेली नाही.

Web Title: Order for action on tankers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.