शवविच्छेदन करणाऱ्या ‘त्या’ डॉक्टरच्या चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 12:55 AM2018-08-30T00:55:24+5:302018-08-30T00:56:03+5:30

घाटी रुग्णालयात हाऊस आॅफिस पदावर कार्यरत असलेल्या पत्नीच्या नावे निवासी वैद्यकीय अधिकारी असलेला पतीच शवविच्छेदन करीत असल्याचे ‘लोकमत’ने बुधवारी चव्हाट्यावर आणले. त्यानंतर घाटी रुग्णालय प्रशासनाने याची गंभीर व तात्काळ दखल घेऊन न्यायवैद्यकशास्त्र विभागप्रमुख के.यू. झिने यांना प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. या चौकशीचा अहवाल तात्काळ सादर करण्याच्या सूचना आपण दिल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

Order of doctor's inquiry into 'those' doctors who performed an autopsy | शवविच्छेदन करणाऱ्या ‘त्या’ डॉक्टरच्या चौकशीचे आदेश

शवविच्छेदन करणाऱ्या ‘त्या’ डॉक्टरच्या चौकशीचे आदेश

googlenewsNext
ठळक मुद्देकानन येळीकर : तात्काळ चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात हाऊस आॅफिस पदावर कार्यरत असलेल्या पत्नीच्या नावे निवासी वैद्यकीय अधिकारी असलेला पतीच शवविच्छेदन करीत असल्याचे ‘लोकमत’ने बुधवारी चव्हाट्यावर आणले. त्यानंतर घाटी रुग्णालय प्रशासनाने याची गंभीर व तात्काळ दखल घेऊन न्यायवैद्यकशास्त्र विभागप्रमुख के.यू. झिने यांना प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. या चौकशीचा अहवाल तात्काळ सादर करण्याच्या सूचना आपण दिल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
शहरातील घाटी रुग्णालयात मराठवाड्यासह खान्देश आणि बुलडाणा आदी जिल्ह्यांतून रुग्ण येतात. या रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण विविध विभागांत दाखल होतात. काहींचा उपचारादरम्यान मृत्यू होतो. मृत्यूचे कारण स्पष्ट न झाल्यास शवविच्छेदन अहवालातून त्याचे कारण स्पष्ट केले जाते. रुग्णालयाच्या आवारातच शवविच्छेदन विभागात मृतांचे शवविच्छेदन केले जाते. शवविच्छेदन करण्याचे काम हाऊस आॅफिस पदावरील व्यक्तीचे असते; पण या पदावरील महिला ही शवविच्छेदन न करता त्यांचा पतीच करीत असल्याचे मंगळवारी आढळून आले होते. निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. विकास राठोड यांनी पत्नी डॉ. अश्विनी राठोड यांच्या नावे मंगळवारी दिवसभर मृतांचे शवविच्छेदन केले. दिवसभरात शवविच्छेदन प्रक्रियेत कुठेही सहभागी नसलेल्या डॉ. अश्विनी राठोड यांनी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घाटी रुग्णालयात दाखल होत शवविच्छेदन अहवालांवर स्वाक्षºया केल्याचेही दिसून आले. ‘पत्नीच्या नावे पतीच करतोय शवविच्छेदन’ अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने बुधवारी प्रकाशित केले. या वृत्तातून घाटी रुग्णालयाचा कारभार चव्हाट्यावर आणला. याचे पडसाद घाटी रुग्णालयात बुधवारी उमटले. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी न्यायवैद्यक शास्त्र विभागप्रमुख के.यू. झिने यांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. याचा चौकशी अहवाल तात्काळ सादर करण्याच्या सूचनाही केल्याचे डॉ. येळीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. घाटी रुग्णालय प्रशासन यावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
निवासी डॉक्टरला बजावली नोटीस
‘पत्नीच्या नावे पतीच करतोय शवविच्छेदन’ अशा आशयाचे वृत्त बुधवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास राठोड यांना तात्काळ खुलासा सादर करण्याचे आदेश घाटी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांनी बुधवारी दिले. तशा आशयाची लेखी नोटीसही बजावण्यात आली आहे.

Web Title: Order of doctor's inquiry into 'those' doctors who performed an autopsy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.