सात जणांना हद्दपार करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:05 AM2017-08-28T00:05:27+5:302017-08-28T00:05:27+5:30
गणेशोत्सव व आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी उपद्रवी ठरणाºया सात जणांना जिल्ह्यातून हद्दपार केल्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी सुचिता शिंदे यांनी काढले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : गणेशोत्सव व आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी उपद्रवी ठरणाºया सात जणांना जिल्ह्यातून हद्दपार केल्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी सुचिता शिंदे यांनी काढले आहेत.
पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप झळके व अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या आदेशावरुन जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत कलम ५६ मुंबई पोलीस कायद्यान्वये सात जणांविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव उपविभागीय अधिकाºयांकडे दाखल केले होते.
या प्रस्तावानुसार उपविभागीय दंडाधिकारी डॉ.सुचिता शिंदे यांनी हे आदेश काढले आहेत. दशरथ पवार (करडगाव ता.परभणी), प्रीतम देशमुख (रा.पिंपरी दे.), संतोष ठाकूर (खाजा कॉलनी, परभणी), अनिल मुळे (सिद्धार्थनगर परभणी), राहुल खटींग (विजयश्रीनगर परभणी), सोनूसिंग टाक (अण्णाभाऊ साठेनगर), दीपक लोखंडे (रा.गौतमनगर, परभणी) या सात जणांविरुद्ध हद्दपारीचे आदेश काढण्यात आले आहेत.