अपघातातील मयतास १४ लाख ८७ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:02 AM2021-09-11T04:02:16+5:302021-09-11T04:02:16+5:30
तालुक्यातील दहेगाव येथील उत्तम रावसाहेब उगले यांच्या दुचाकीला कारने धडक दिल्याने करंजगाव शिवारात त्यांचा मृत्यू झाला होता. घरचा कर्ता ...
तालुक्यातील दहेगाव येथील उत्तम रावसाहेब उगले यांच्या दुचाकीला कारने धडक दिल्याने करंजगाव शिवारात त्यांचा मृत्यू झाला होता. घरचा कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबीय अडचणीत सापडले होते. अपघातग्रस्त कारचा विमा उतरवलेला होता. तसेच चालकाकडे वाहन चालविण्याचा परवाना होता. घरातला कर्ता पुरुष गेल्याने मयत उत्तम उगले यांचे वारस आई, वडील, पत्नी व दोन मुलांनी नुकसानभरपाई मिळण्यासाठी अपघात न्याय प्राधिकरणाकडे दावा दाखल केला होता. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून मोटार अपघात प्राधिकरणाचे न्यायाधीश एम. मोहियोद्दीन एम. ए. यांनी १४ लाख ८७ हजार रुपये नुकसानभरपाई मयताच्या वारसास देण्याचे विमा कंपनीला आदेश दिले. या रकमेवर दावा दाखल झाल्यापासून रक्कम मिळेपर्यंत ९ टक्के व्याज देण्याचे आदेश प्राधिकरणाने दिले आहेत. अर्जदारातर्फे ॲड. मोहित आर. मालपाणी यांनी काम पाहिले.