जास्त रकमेवर दहा टक्के दराने व्याज देण्याचा आदेश

By Admin | Published: November 14, 2015 12:37 AM2015-11-14T00:37:46+5:302015-11-14T00:52:58+5:30

औरंगाबाद : म्हाडाने ठरविलेल्या किमतीपेक्षा (म्हणजे १३ लाख ३४ हजार रुपयांपेक्षा) तक्रारदार किरण अरुण शिरूरकर यांच्याकडून गैरअर्जदार जास्त रकमेवर दहा टक्के दराने व्याज देण्याचा आदेश

An order to pay ten percent interest on a higher amount | जास्त रकमेवर दहा टक्के दराने व्याज देण्याचा आदेश

जास्त रकमेवर दहा टक्के दराने व्याज देण्याचा आदेश

googlenewsNext


औरंगाबाद : म्हाडाने ठरविलेल्या किमतीपेक्षा (म्हणजे १३ लाख ३४ हजार रुपयांपेक्षा) तक्रारदार किरण अरुण शिरूरकर यांच्याकडून गैरअर्जदार औरंगाबाद हाऊसिंग अ‍ॅण्ड एरिया डेव्हलपमेंट यांनी जादा घेतलेल्या रकमेवर वार्षिक १० टक्के व्याजदराने बँक डीडीने आदेशापासून ३० दिवसांच्या आत रक्कम परत करण्याचा आदेश औरंगाबाद जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे सदस्य किरण ठोले यांनी नुकताच दिला आहे.
तसेच तक्रारदारास गाळ्याचा ताबा दोन वर्षांत दिला नाही. गाळा ताब्यात देण्यास दोन वर्षांपेक्षा जास्त लागलेल्या कालावधीसाठी म्हाडाने गाळ्याच्या किमतीवर (म्हणजे १३ लाख ३४ हजार रुपयांवर) वार्षिक १० टक्के दराने बँक डीडीने आदेशापासून ३० दिवसांच्या आत व्याज द्यावे, असेही आदेशात म्हटले आहे.
म्हाडाने २२ सप्टेंबर २००७ रोजी काही अटी टाकून तीन प्रकारचे गाळे विक्रीसाठी वृत्तपत्रात जाहिरात दिली होती. तक्रारदार किरण शिरूरकर यांनी त्यापैकी उच्च उत्पन्न गटातील गारखेडा येथील २६ गाळ्यांपैकी एका गाळ्यासाठी अर्ज केला होता. जाहिरातीत दर्शविल्याप्रमाणे गाळ्याची किंमत १३ लाख ३४ हजार रुपये इतकी होती. तक्रारदाराने गाळ्याच्या किमतीपैकी १० टक्के म्हणजे १ लाख ३३ हजार ४०० रुपये अर्जासोबत भरले होते. उर्वरित रक्कम बांधकाम सुरू झाल्यानंतर प्रत्येकी २ लाख १०० च्या त्रैमासिक हप्त्याने सहा हप्त्यांत म्हणजे बांधकाम सुरू झाल्यापासून दीड वर्षात रक्कम भरावयाची होती.
जाहिरातीच्या तारखेपासून दोन वर्षांच्या आत गैरअर्जदाराने तक्रारदारास गाळा ताब्यात द्यावयाचा होता. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार गाळा ताब्यात देण्यासाठी सहा वर्षे लागली. सहा वर्षांत गाळ्याची किंमत दोन वेळा एकूण ९ लाख ४३ हजार ८७० रुपयांनी वाढली. तक्रारदाराने गाळा खरेदी करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतले होते. त्या कर्जाच्या परतफेडीचे हप्तेसुद्धा सुरू झाले होते. गाळा ताब्यात न मिळाल्यामुळे इतरत्र राहण्याचा खर्च व बँकेचे हप्ते यांचा बोजा तक्रारदारास सहन करावा लागला.

Web Title: An order to pay ten percent interest on a higher amount

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.