मागवला मोबाईल मिळाला दगड; ऑनलाईन खरेदीत फसवणुकीच्या धक्क्याने युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 11:37 AM2019-02-20T11:37:30+5:302019-02-20T12:03:21+5:30

आपले पैसे वाया गेले या विचाराने तो व्यथित होता

Orderd phone, delivered stone; Youth suicide due to fraud in online shopping | मागवला मोबाईल मिळाला दगड; ऑनलाईन खरेदीत फसवणुकीच्या धक्क्याने युवकाची आत्महत्या

मागवला मोबाईल मिळाला दगड; ऑनलाईन खरेदीत फसवणुकीच्या धक्क्याने युवकाची आत्महत्या

googlenewsNext

सिल्लोड (जि. औरंगाबाद) : १५ हजारांचा मोबाईल ऑनलाईन मागविला. मात्र, त्यात दगड निघाल्याने नाराज झालेल्या अनिल उत्तम पाडळे (२१, रा. धोत्रा, ता. सिल्लोड) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली.

हे पार्सल घेण्यासाठी अनिल मंगळवारी दुपारी पानवडोद येथील टपाल कार्यालयात गेला होता. पार्सल सोडविल्यानंतर त्यात दगडाचे तुकडे आढळल्याने आपले १५ हजार रुपये वाया गेले, या विचाराने त्याला नैराश्य आले. यानंतर मित्र व नातेवाईकांना अनिलने ही बाब सांगितली. फसवणूक झाल्याने त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी अजिंठा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. त्याचे शवविच्छेदन सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. धोत्रा येथे रात्री उशिरा अनिलवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अद्याप तक्रार नाही 
ऑनलाईन मोबाईल खरेदीत फसवणूक झाल्याने त्याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे; मात्र आमच्याकडे अजून काही तशी तक्रार आली नाही. जबाब घेतल्यावर मृत्यूचे नेमके कारण कळेल.
- किरण आहेर, सहायक पोलीस निरीक्षक, अजिंठा

Web Title: Orderd phone, delivered stone; Youth suicide due to fraud in online shopping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.