जैविक खतांच्या किमती ठरेनात; साठा पडून
By Admin | Published: May 30, 2016 12:52 AM2016-05-30T00:52:13+5:302016-05-30T01:10:06+5:30
औरंगाबाद : खरीप हंगामात पेरणीआधी बियाणांना लावायच्या जैविक खतांच्या किमती शासनाने अजूनही ठरविलेल्या नाहीत. त्यामुळे शासनाच्या जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळेत या खतांचा साठा तसाच पडून आहे.
औरंगाबाद : खरीप हंगामात पेरणीआधी बियाणांना लावायच्या जैविक खतांच्या किमती शासनाने अजूनही ठरविलेल्या नाहीत. त्यामुळे शासनाच्या जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळेत या खतांचा साठा तसाच पडून आहे.
राज्यात दहा ठिकाणी शासनाच्या जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळा आहेत. या प्रयोगशाळांमध्ये द्रव स्वरुपातील जैविक खतांची निर्मिती केली जाते. या जैविक खतांचा वापर पेरणीआधी बियाणांना लावण्यासाठी होतो.
सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिकांसाठी ही खते फायद्याची ठरतात. त्यामुळे शेतकऱ्यांकडूनही या खतांना मागणी असते. औरंगाबादसह राज्यात दहा ठिकाणी असणाऱ्या प्रयोगशाळांमध्ये यंदाही द्रव स्वरुपातील जैविक खतांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, आतापर्यंत शासनाने या खतांचे यंदाचे दर ठरविलेले नाहीत. त्यामुळे अजूनही खतांचा साठा तसाच पडून आहे.
औरंगाबादेतील जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळेत बऱ्याच दिवसांपासून खतांचे उत्पादन सुरू आहे. यंदा खरीप हंगामासाठी म्हणून आतापर्यंत २ हजार ८८ लिटर खत उत्पादन करण्यात आले आहे.
४यामध्ये रायझोबीयम (सोयाबीन) चे उत्पादन ६७५ लिटर, रायझोबीयम (तूर, मूग, उडीद) ७५ लिटर, अॅझटोबॅक्टर १३८ लिटर आणि पीएसबी १२०० लिटर खत आहे.