पक्षी महोत्सवाचे जानेवारीत आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:47 AM2017-12-13T00:47:18+5:302017-12-13T00:47:23+5:30
एन्व्हायर्नमेंट रिसर्च फाऊंडेशन, वनविभाग, वन्यजीव विभाग, सामाजिक वनीकरण, इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअर्स आणि निसर्ग मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ६ व ७ जानेवारी २०१८ रोजी पक्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : एन्व्हायर्नमेंट रिसर्च फाऊंडेशन, वनविभाग, वन्यजीव विभाग, सामाजिक वनीकरण, इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअर्स आणि निसर्ग मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ६ व ७ जानेवारी २०१८ रोजी पक्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवात पक्षी छायाचित्र स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत एका छायाचित्रकाराला पाच छायाचित्रे पाठविता येतील. १२ बाय १८ या पेपरवर छायाचित्र प्रिंट केलेले असावे. शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे विषय पुढीलप्रमाणे, ‘चिमण्या गेल्या कुणीकडे’, ‘वृक्ष लागवड हा प्रभावी पर्याय आहे का’, ‘शास्त्रज्ञ म्हणून तुम्ही पृथ्वी कशी वाचवाल आणि पक्षी स्थलांतर’ यापैकी एका विषयावर निबंध पाठवावा लागेल. खुल्या गटासाठी ‘निबंध पक्षी पर्यटन’, ‘जायकवाडी-एक समुद्र’, ‘पक्षी अभ्यारण्य’, ‘माझ्या शहराचे पर्यावरण-समस्या आणि उपाय व प्राचीन भारतातील पक्षी जीवन’, या विषयांपैकी एका विषयावर निबंध लिहावा लागणार आहे. नि:शुल्क स्पर्धा असून, २५ डिसेंबरपर्यंत निबंध व छायाचित्र स्वीकारले जातील. विजेत्यांना महोत्सवात बक्षीस देण्यात येईल, असे सीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ यांनी कळविले आहे.