जिल्हाभरात १७ शिबिरांचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:04 AM2021-07-03T04:04:01+5:302021-07-03T04:04:01+5:30
लोकमत नातं रक्ताचे उपक्रमांतर्गत ४ जुलै रोजी युनायटेड सिग्मा हाॅस्पिटल, शहानूरमियाॅं दर्गा परिसर, कास्ट्राइब कर्मचारी महासंघाच्या सहकार्याने ५ जुलै ...
लोकमत नातं रक्ताचे उपक्रमांतर्गत ४ जुलै रोजी युनायटेड सिग्मा हाॅस्पिटल, शहानूरमियाॅं दर्गा परिसर, कास्ट्राइब कर्मचारी महासंघाच्या सहकार्याने ५ जुलै रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी), मसिआच्या सहकार्याने ५ जुलै रोजी वाळूज एमआयडीसी येथे मसिआ हाॅल, तर चिकलठाणा एमआयडीसी येथे मसिआ हाॅल, शिवा ट्रस्टच्या सहकार्याने यशवंतराव चव्हाण आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय बीड बायपास निपाणी भालगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
६ जुलै रोजी सोयगाव तालुक्यात घोसला ग्रामपंचायत, वैजापूर तालुक्यातील शिऊर येथे संत बहिणाबाई माध्यमिक विद्यालय, ७ जुलै रोजी कन्नड, ८ जुलै रोजी कन्नड तालुक्यातील पिशोर ग्रामपंचायत, ९ जुलै रोजी गंगापूर तालुक्यातील लासूर नाका, वैजापूर येथे कृष्णा लाॅन, १० जुलै रोजी बाजार समिती इमारत, करमाड, १२ जुलै रोजी फुलंब्री ग्रामीण रुग्णालय, पैठण येथे आशीर्वाद मंगल कार्यालय, १३ जुलै रोजी शेवंताबाई मंगल कार्यालय सिल्लोड, खुलताबाद येथे नगर परिषद सभागृह येथे, तर १५ जुलै रोजी गंगापूर येथे जैन मंगल कार्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.