अपंगांसाठी कृत्रिम अवयवांचे वाटप शिबीर

By Admin | Published: December 20, 2015 11:46 PM2015-12-20T23:46:26+5:302015-12-20T23:59:11+5:30

औरंगाबाद : अपंगांसाठी कृत्रिम पाय, कॅलिफर्स, कुबड्या व सायकलचे मोफत वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Organizing artificial limbs for disabled people | अपंगांसाठी कृत्रिम अवयवांचे वाटप शिबीर

अपंगांसाठी कृत्रिम अवयवांचे वाटप शिबीर

googlenewsNext

औरंगाबाद : भानुदासराव चव्हाण प्रतिष्ठान व भगवान महावीर विकलांग सहायता समिती, मुंबईच्या वतीने अपंगांसाठी कृत्रिम पाय, कॅलिफर्स, कुबड्या व सायकलचे मोफत वाटप शिबिराचे आयोजन १५ ते २० जानेवारीदरम्यान शहरात करण्यात आले आहे.
यासंदर्भात आयोजित पत्रपरिषदेत भानुदासराव चव्हाण प्रतिष्ठाणचे अध्यक्ष आ.सतीश चव्हाण यांनी सांगितले की, लाभार्र्थींनी १० जानेवारीपर्यंत आपली नावनोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी लाभार्र्थींनी फोटो, मतदान कार्डची झेरॉक्स, अपंग असल्याचे प्रमाणपत्र सोबत आणावे. याकरिता प्रत्येक तालुक्यात नावनोंदणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. औरंगाबाद शहर व तालुक्यातील लाभार्र्थींची आ. सतीश चव्हाण यांच्या सहकारनगर येथील कार्यालयात नोंदणी करण्यात येत आहे. डॉ. बाबर हॉस्पिटल (पैठण), विनायकराव पाटील महाविद्यालय (वैजापूर), मुक्तानंद महाविद्यालय (गंगापूर), न्यू हायस्कूल (कन्नड), चिश्तिया महाविद्यालय (खुलताबाद), नितीन देशमुख यांचे संपर्क कार्यालय (फुलंब्री), यशवंतराव चव्हाण महाविद्यालय (सिल्लोड) व अ‍ॅड. योगेश पाटील, काळे गल्ली (सोयगाव) येथे सकाळी १० ते ४ वाजेदरम्यान नावनोंदणी करण्यात येणार आहे.
यानंतर १५ ते २० जानेवारीदरम्यान आयोजित शिबिरात अपंगांसाठी कृत्रिम पाय, कॅलिफर्स, कुबड्या व सायकलचे वाटप करण्यात येईल. शिबिराची माहिती व स्थळ लाथार्भीला मोबाईलवर कळविण्यात येईल, याचा लाभ गरजूंनी घ्यावा, असे आवाहन आ.चव्हाण यांनी केले.

Web Title: Organizing artificial limbs for disabled people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.