रांजणगावात प्रवेश दिंडीचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:06 AM2021-06-16T04:06:13+5:302021-06-16T04:06:13+5:30
वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी जिल्हा परिषद शाळेच्यावतीने रविवारी (दि.१३) प्रवेश दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रवेश दिंडीत ...
वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी जिल्हा परिषद शाळेच्यावतीने रविवारी (दि.१३) प्रवेश दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रवेश दिंडीत प्रशालेचे शिक्षकवृंद, शालेय समितीचे पदाधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी सहभाग घेत मुलांना शाळा प्रवेशाचे आवाहन केले.
नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असली तरी कोरोनामुळे विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास परवानगी नाही. मुख्याध्यापक व शिक्षकांकडून नवीन शैक्षणिक वर्षाच्या कामकाजाला सुरुवात करण्यात आली. गावातील पालकांनी आपल्या पाल्यांचा जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घ्यावा, यासाठी रविवारी प्रवेश दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीचा शुभारंभ पंचायत समिती सदस्य दीपक बडे, सरपंच कांताबाई जाधव, जिल्हा परिषद सदस्या उक्षा हिवाळे, उपसरपंच शिवराम ठोंबरे, मुख्याध्यापक विजय चौधरी, मुख्याध्यापिका ज्योती भालेराव, शालेय व्यवस्थापन समितीचे रामेश्वर बोरुडे, बद्रीनाथ लोंखडे आदींच्या उपस्थितीत करण्यात आला. विविध घोष वाक्याचे फलक, डिजिटल फलक तसेच शाळेची माहिती असलेली ऑडियो क्लिप वाजवून गावातून प्रवेश दिंडी काढण्यात आली. शिक्षक, लोकप्रतिनिधी, शालेय समितीचे विद्यार्थी आदींनी विविध घोषणा देत पालकांना जिल्हा परिषद शाळेतच आपल्या पाल्यांना प्रवेश देण्याचे आवाहन केले.
फोटो ओळ- रांजणगाव जि.प.शाळेच्यावतीने प्रवेश दिंडी काढुन पालकांनी आपल्या पाल्यांना जि.प.शाळेत प्रवेश देण्याचे आवाहन केले.
------------------------
वाळूजला तलाठी संघाची गंगापूर तालुका कार्यकारिणी जाहिर
वाळूज महानगर : वाळूज येथे गंगापूर तालुका तलाठी संघाची कार्यकारिणी निवडीसाठी नुकतेच बैठक झाली. या बैठकीला प्रमूख पाहुणे म्हणून जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्ष सतीश तुपे, सरचिटणीस अनिल सुर्यवंशी, जिल्हा कार्यकारिणीचे अनिल ठोंबरे, सतीश भदाणे, दीपक कराळे, अशोक कळसकर, कृष्णा गायके, महिला संघटक रिता पुरी, शुभांगी शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत गंगापूर तालुका तलाठी संघाची कार्यकारिणी पुढील प्रमाणे जाहिर करण्यात आली. अध्यक्ष- जितेंद्र कळसकर, सरचिटणीस- प्रशांत बनकर, उपाध्यक्ष- राहुल वंजारी, कार्याध्यक्ष- ज्योती तोंडे, कोषाध्यक्ष- अनिल कानडे, सहसचिव- सिंधु मगरे, संघटक- श्रीराम जोशी, विश्वनाग गांगर्डुे, महिला उपाध्यक्षा अंजली घुगे, निमंत्रित सदस्य -रविकांत गहिरे, सल्लागार- बाळासाहेब ठोंबरे, अशोक कळसकर, सुखदेव राठोड, महिला प्रतिनिधी-गंगा जगताप, कल्पना गायसमुद्रे आदीं.
फोटो ओळ-
----------------------------