उस्मानाबादची लातूरवर एक डाव २१३ धावांनी मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 11:52 PM2018-05-25T23:52:30+5:302018-05-25T23:53:57+5:30
अभिषेक पवारची कर्णधाराला साजेशी द्विशतकी खेळी आणि त्यानंतर यश लोमटे, सचिन माळी, गिरीश बोचरे यांची सुरेख गोलंदाजी या बळावर उस्मानाबाद संघाने नाशिक येथे सुरू असलेल्या एमसीएच्या १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी लातूर संघावर एक डाव आणि २१३ धावांनी मात केली. गत वर्षी १६ वर्षांखालील विजय मर्चंट ट्रॉफीत महाराष्ट्राचे कर्णधारपद भूषविणाऱ्या अभिषेक पवार याने १७२ चेंडूंत २८ चौकार व ६ षटकारांसह ठोकलेल्या २0३ धावांच्या बळावर उस्मानाबादने त्यांचा पहिला डाव ८ बाद ४१६ धावांवर घोषित केला होता.
औरंगाबाद : अभिषेक पवारची कर्णधाराला साजेशी द्विशतकी खेळी आणि त्यानंतर यश लोमटे, सचिन माळी, गिरीश बोचरे यांची सुरेख गोलंदाजी या बळावर उस्मानाबाद संघाने नाशिक येथे सुरू असलेल्या एमसीएच्या १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी लातूर संघावर एक डाव आणि २१३ धावांनी मात केली.
गत वर्षी १६ वर्षांखालील विजय मर्चंट ट्रॉफीत महाराष्ट्राचे कर्णधारपद भूषविणाऱ्या अभिषेक पवार याने १७२ चेंडूंत २८ चौकार व ६ षटकारांसह ठोकलेल्या २0३ धावांच्या बळावर उस्मानाबादने त्यांचा पहिला डाव ८ बाद ४१६ धावांवर घोषित केला होता. त्यानंतर कालच्या ३ बाद २९ या धावसंख्येवरून खेळणाºया लातूरचा पहिला डाव २४.१ षटकांत ८२ धावांत आटोपला. त्यांच्याकडून आशितोष पाटील (२४) व यश बारगे (१९) हेच दुहेरी आकडी धावा फटकावू शकले. उस्मानाबादकडून यश लोमटेने २४ धावांत ५ गडी बाद केले. प्रथमेश पाटील, गिरीश बोचरे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. उस्मानाबादने दुसºया डावात फलंदाजी न करता लातूरवर फॉलोआॅन लादला. लातूरचा दुसरा डाव ३२.५ षटकांत १२१ धावांत संपुष्टात आला. त्यांच्याकडून अर्जुन कावळेने ४१, यश बारगेने ३२ व स्वरूप बैनगिरेने २५ धावा केल्या. उस्मानाबादकडून सचिन माळीने ३१ धावांत ६ व गिरीश बोचरेने ३४ धावांत ४ गडी बाद करीत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
संक्षिप्त धावफलक
उस्मानाबाद (पहिला डाव) : ७८ षटकांत ८ बाद ४१६ धावा (घोषित) (अभिषेक पवार २०३, यश लोमटे ५०. दौलत पाटील ४/५०). विजयी विरुद्ध लातूर : पहिला डाव २४.१ षटकांत सर्वबाद ८२. (आशितोष पाटील २४, यश बारगे १९. यश लोमटे ५/२४, प्रथमेश पाटील २/९, गिरीश बोचरे २/६). दुसरा डाव : ३२.५ षटकांत सर्वबाद १२१. (अर्जुन कावळे ४१, यश बारगे ३२, स्वरूप बैनगिरे २५. सचिन माळी ६/३१, गिरीश बोचरे ४/३४).