विजय मर्चंट ट्रॉफीसाठी उस्मानाबादचा अभिषेक पवार महाराष्ट्राचा कर्णधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 12:43 AM2017-12-07T00:43:39+5:302017-12-07T00:44:41+5:30
मुंबई येथे ७ ते ९ डिसेंबदरम्यान होणाºया १६ वर्षांखालील विजय मर्चंट ट्रॉफीसाठी महाराष्ट्राचा संघ आज पुणे येथे जाहीर झाला. महाराष्ट्राचे कर्णधारपद उस्मानाबादचा अभिषेक पवार भूषविणार आहे.
औरंगाबाद : मुंबई येथे ७ ते ९ डिसेंबदरम्यान होणाºया १६ वर्षांखालील विजय मर्चंट ट्रॉफीसाठी महाराष्ट्राचा संघ आज पुणे येथे जाहीर झाला. महाराष्ट्राचे कर्णधारपद उस्मानाबादचा अभिषेक पवार भूषविणार आहे. या संघात उस्मानाबादचा राजवर्धन हंगरगेकर आणि नांदेडच्या उबेद खान यांचाही समावेश आहे. महाराष्ट्राची सलामीची लढत मुंबईविरुद्ध ७ ते ९ डिसेंबर रोजी होणार आहे. यानंतर महाराष्ट्राचा सामना पुणे येथे १३ ते १५ डिसेंबदरम्यान बडोदा, १९ ते २१ डिसेंबदरम्यान सौराष्ट्र संघाविरुद्ध होणार आहे. साखळीतील अखेरची लढत महाराष्ट्राची सुरत येथे २५ ते २७ डिसेंबदरम्यान गुजरात संघाविरुद्ध होणार आहे.
महाराष्ट्राचा कर्णधार म्हणून निवड झालेल्या अभिजित पवार याने एमसीएच्या निमंत्रित संघांच्या १६ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत भरीव कामगिरी केली आहे. त्याने नाशिक येथील सामन्यात डीवाय पाटील संघाविरुद्ध नाबाद २०७, धुळे येथील सामन्यात नंदुरबारविरुद्ध ७५, जळगावविरुद्ध नाबाद ५१ धावा केल्या होत्या. तसेच सुपरलीगमध्ये त्याने कॅडेन्स संघाविरुद्ध १२७ धावांची खेळी केली हेती. तसेच मुंबई संघाविरुद्ध सराव सामन्यात १०६ धावा ठोकल्या होत्या.
नांदेडच्या उबेद खान यानेही चमकदार कामगिरी करताना ५ सामन्यात ५६.६७ च्या सरासरीने ३४० धावा ठोकल्या होत्या. त्यात त्याने ४ अर्धशतके ठोकली होती. तसेच या संघात निवड झालेल्या उस्मानाबादच्या राजवर्धन हंगरगेकर हा वेगवान गोलंदाज असून, त्याची पश्चिम विभागीय शिबिरासाठी निवड झाली होती. महाराष्ट्राच्या संघात निवड झालेल्या अभिषेक पवार व राजवर्धन हंगरेकर यांना राम हिरापुरे यांचे तर नांदेडच्या उबेद खान याला मोईन अब्दुल रहिम यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
महाराष्ट्राचा संघ : अभिषेक पवार (कर्णधार), अथर्व धर्माधिकारी, दानिश पटेल, हर्षल काटे (उपकर्णधार), कौशल तांबे, उबेद खान, श्रेयस वालेकर, अविराज गावंडे, इस्माईल तांबे, राजवर्धन हंगरगेकर, विकी ओस्वाल, अनिकेत नलावडे, नचिकेत ठाकूर, शुभम खरात.