स्वप्नीलच्या भेदक गोलंदाजीने उस्मानाबादचा सनसनाटी विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 12:18 AM2018-04-09T00:18:03+5:302018-04-09T00:19:14+5:30
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे जळगाव येथे शनिवारी झालेल्या सिनिअर लीग क्रिकेट स्पर्धेत स्वप्नील गंभिरे याच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर उस्मानाबादने पुण्याच्या देवधर ट्रस्ट संघावर ९ गडी राखून सनसनाटी विजय मिळवला. उस्मानाबादच्या विजयाचा शिल्पकार ठरणाऱ्या स्वप्नील गंभिरे याने या सामन्यात ८0 धावांत एकूण ११ बळी घेतले. अभिषेक पवार यानेही सुरेख अर्धशतकी खेळी करताना उस्मानाबादच्या विजयात योगदान दिले.
औरंगाबाद : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे जळगाव येथे शनिवारी झालेल्या सिनिअर लीग क्रिकेट स्पर्धेत स्वप्नील गंभिरे याच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर उस्मानाबादने पुण्याच्या देवधर ट्रस्ट संघावर ९ गडी राखून सनसनाटी विजय मिळवला.
उस्मानाबादच्या विजयाचा शिल्पकार ठरणाऱ्या स्वप्नील गंभिरे याने या सामन्यात ८0 धावांत एकूण ११ बळी घेतले. अभिषेक पवार यानेही सुरेख अर्धशतकी खेळी करताना उस्मानाबादच्या विजयात योगदान दिले.
स्वप्नील गंभिरेच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर उस्मानाबाद संघाने देवधर ट्रस्टला पहिल्या डावात १६४ धावांवर रोखले. देवधर ट्रस्टकडून गौरव गणपुले याने ९७ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह ५२, ओंकार उदावंतने ३२ व सौरभ संकलेचा याने २१ धावा केल्या. उस्मानाबादकडून स्वप्नील गंभिरे याने ५७ धावांत ४ गडी बाद केले. त्याला रघुनाथ बन, सतीश नाईकवाडी व रोहन क्षीरसागर यांनी प्रत्येकी २ गडी बाद करीत साथ
दिली.
त्यानंतर प्रत्युत्तरात उस्मानाबाद संघानेही दुसºया डावात १६४ धावा फटकावल्या. त्यांच्याकडून अभिषेक पवारने सर्वाधिक १७१ चेंडूंत ५ चौकारांसह ६२ धावा केल्या. सतीश नाईकवाडीने ३१ व रघुनाथ बन याने २७ धावांचे योगदान दिले. देवधर ट्रस्ट संघाकडून प्रफुल्ल महाले व इशान कुलकर्णी यांनी प्रत्येकी ३, तर गौरव गणपुलेने ७ धावांत २ गडी बाद केले. त्यानंतर सुरेख आऊट व इनिस्वंग टाकणाºया स्वप्नील गंभिरे याच्या भेदक माºयासमोर देवधर ट्रस्टचा संघ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे १४.१ षटकांत ५0 धावांत कोसळला.
त्यांच्याकडून सौरभ संकलेचा (१४), ओंकार उदावंत (११) व एन. जाधव (११) हे तिघेच दुहेरी आकडी धावा पार करू शकले. उस्मानाबादकडून स्वप्नील गंभिरेने २३ धावांत ७ गडी बाद केले. त्याला चैतन्य पाटीलने २७ धावांत ३ गडी बाद करीत साथ दिली. त्यानंतर उस्मानाबादने विजयी लक्ष्य १७.२ षटकांत १ गडी गमावून ५१ धावा करीत पूर्ण केले. रघुनाथ बन ३ चौकारांसह २४ व चैतन्य पाटील १८ धावांवर नाबाद राहिले. देवधरकडून कृष्णा पवारने १२ धावांत १ गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
देवधर ट्रस्ट (पहिला डाव) ४८.१ षटकांत १६४. (गौरव गणपुले ५२, ओंकार उदावंत ३२, सौरभ संकलेचा २१. स्वप्नील गंभिरे ४/५७, रघुनाथ बन २/१६, सतीश नाईकवाडी २/५४, रोहन क्षीरसागर २/२६). दुसरा डाव : १४.१ षटकांत सर्वबाद ५0. (सौरभ संकलेचा १४. स्वप्नील गंभिरे ७/२३, चैतन्य पाटील ३/२७).
उस्मानाबाद (पहिला डाव) : ५८.२ षटकांत सर्वबाद १६४. (अभिषेक पवार ६२, रघुनाथ बन २७, सतीश नाईकवाडी ३१. प्रफुल्ल महाले ३/३९, इशान कुलकर्णी ३/५२, गौरव गणपुले २/७). दुसरा डाव : १७.२ षटकांत १ बाद ५१. (रघुनाथ बन नाबाद २४, चैतन्य पाटील नाबाद १८. कृष्णा पवार १/१२).