...अन्यथा महापालिका बरखास्त करू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 04:36 AM2018-07-19T04:36:52+5:302018-07-19T04:37:07+5:30

महापालिका आयुक्तांनी शहर कचरामुक्त करण्यासाठी निर्धारित वेळ जनतेला सांगावी.

... otherwise sack the municipality | ...अन्यथा महापालिका बरखास्त करू

...अन्यथा महापालिका बरखास्त करू

googlenewsNext

औरंगाबाद : महापालिका आयुक्तांनी शहर कचरामुक्त करण्यासाठी निर्धारित वेळ जनतेला सांगावी. दोन दिवसांत आराखडा तयार करा, यानंतरही कचरा समस्या सुटण्यात राजकीय पक्षांनी (शिवसेनेचे नाव न घेता) आडकाठी आणून जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न झाल्यास महापालिका बरखास्त करू, अशी ताकीद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली.
नागपूर येथे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या दालनात बुधवारी कचरा प्रश्नावर पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीवर शिवसेना पदाधिकाºयांनी अघोषित बहिष्कार टाकून मुंबईला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे कचºयावर बोलाविलेल्या बैठकीला हजेरी लावली. बैठकीला मुख्यमंत्री, बागडे यांच्यासह उपमहापौर विजय औताडे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक, जिल्हाधिकारी उदय चौधरी, आ. अतुल सावे, आ. संजय शिरसाट, प्रवक्ते शिरीष बोराळकर यांची उपस्थिती होती.
कचºयाची समस्या सोडवावी, यासाठी तुम्हाला औरंगाबादेत पाठविले आहे. तेथील नागरिकांच्या जिवाशी खेळ करू नका, १०० कोटी रस्त्यांसाठी दिले असून, त्याची व कचरा प्रक्रियेची निविदा आजवर पारदर्शकपणे पार पडली नाही. तेथील राजकारणाला बळी पडू नका. रस्त्यांसाठी आणखी १०० कोटी दिले असते, पण पहिलाच निधी निविदेत अडकला आहे. निविदा प्रक्रिया खिळखिळी असेल तर विभाग बदलून टाका. पालिका प्रशासनाने जनतेला वेठीस धरू नये, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले.
निधीची गरज पडल्यास आणखी ५० कोटी देणे शक्य आहे. पोलीस बंदोबस्त देण्यासाठी पोलीस आयुक्तांना आदेश देण्यात येतील. राजकीय आडकाठी आणणाºयांवर कायदेशीर कारवाई करा, असे मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना सूचित केले.

Web Title: ... otherwise sack the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.