‘बॅडपॅच’मधून बाहेर !

By Admin | Published: October 21, 2014 12:19 AM2014-10-21T00:19:23+5:302014-10-21T00:58:01+5:30

संजय तिपाले , बीड ऐंशीच्या दशकात गेवराई व आष्टी मतदारसंघातील राजकीय वर्तुळ गाजविणारे माधवराव पवार, भीमराव धोंडे या तगड्या पहेलवानांना मधल्या काही वर्षांत ‘बॅडपॅच’ मधून जावे लागले़

Out of 'Badpatch'! | ‘बॅडपॅच’मधून बाहेर !

‘बॅडपॅच’मधून बाहेर !

googlenewsNext


संजय तिपाले , बीड
ऐंशीच्या दशकात गेवराई व आष्टी मतदारसंघातील राजकीय वर्तुळ गाजविणारे माधवराव पवार, भीमराव धोंडे या तगड्या पहेलवानांना मधल्या काही वर्षांत ‘बॅडपॅच’ मधून जावे लागले़ तब्बल दोन तप ही घराणी राजकीय विजनवासात होती; परंतु यावेळी या घराण्यांचा ‘राजयोग’ आला़ प्रस्थापितांना जोराचे हादरे देत माधवराव पवार यांचे पुत्र अ‍ॅड़ लक्ष्मण पवार व भीमराव धोंडे यांनी विधानसभेत दणदणीत ‘एंट्री’ करतानाच नव्या ‘इनिंग’लाही सुरुवात केली़ धोंडे चौथ्यांदा विधानसभेत पोहचले तर अ‍ॅड़ पवार यांनी पहिल्याच प्रयत्नात आमदारकीचा गुलाल लावला़
माधवराव पवार अन् भीमराव धांडे यांचे नेतृत्व एकाचवेळी उदयाला आले़ पवार यांना वडील शाहूराव पवार यांचा राजकीय वारसा होता तर धोंडे हे सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आले़ शिवाजीराव पंडित यांच्या सत्तेला सुरुंग लावत १९९० मध्ये माधवराव पवार पहिल्यांदा विधासनसभेत निवडून गेले़ पवार एस काँग्रेस तर पंडित इंदिरा काँग्रेसकडून लढले होते़ १९८५ मध्येही या दोघांमध्येच सामना झाला; परंतु पवार इंदिरा काँग्रेसचे तर पंडित एस काँगे्रसचे उमेदवार होते़ या लढतीत पंडित यांनी पवारांना चित करुन ‘हिशेब’ पूर्ण केला होता़ त्यानंतर पवार यांनी पुन्हा नशीब आजमावले़ मात्र, पंडित यांच्यापुढे त्यांचा निभाव लागला नाही़ नंतरच्या काळात माधवराव पवार यांना फक्त गेवराई शहरापुरतेच जखडून ठेवत पंडितांनी मतदारसंघात हुकूमत गाजवली़ अडीच वर्र्षांपूर्वी माधवराव पवार यांचे चिरंजीव अ‍ॅड़ लक्ष्मण पवार यांनी भाजपात प्रवेश केला़ दोन पंडित राष्ट्रवादीत तर एकटे पवार भाजपात असे नवे समीकरण बनले़ लोकसभा निवडणुकीत पवारांनी मतदारसंघ ढवळून काढत सराव केला होता़ काल दोन पंडितांशी एकाकी झुंज देताना अ‍ॅड़ पवार यांची कसोटी लागली होती़ पंडितांच्या एकीने झालेली ‘रिअ‍ॅक्शन’ पवारांच्या पथ्यावर पडली़ पंडितविरोधी लाट ‘कॅश’ करताना पवारांनी बदामरावांना ‘क्लिनबोल्ड’ केले़
चुरशीच्या लढतीत
धोंडेच ‘संघर्षनायक’!
१९७८ मध्ये आष्टी तालुक्यात शेतकरी संघटनेच्या माध्यमातून भीमराव धोंडे यांचे नेतृत्व फुलले़ १९७८ मध्ये ते अपक्ष मैदानात होते; पण त्यांचा पराभव झाला़ १९८० मध्ये दुसऱ्या प्रयत्नात अपक्ष नशीब आजमावणारे धोंडे विजयी झाले़ पुढे १९८५, १९९० मध्ये त्यांनी काँग्रेसकडून विधानसभावारी केली़ १९९५ मध्ये त्यांना साहेबराव दरेकर यांनी धक्का दिला होता़ १९९९, २००४ मध्ये धोंडेंची निराशा झाली़ नंतर त्यांनी भाजपाचा आश्रय घेतला़
२००९ मध्ये भाजपाने बाळासाहेब आजबेंना उमेदवारी दिली़ त्यामुळे धोंडेंनी बंडाचे निशाण फडकावत राष्ट्रवादीत उडी घेतली़ लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ते पुन्हा भाजपात परतले आणि आजबेंऐवजी त्यांना संधी मिळाली़ या संधीचे सोने करत त्यांनी धस यांच्या पंधरा वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला़
२० वर्षांपासून सत्तेबाहेर राहिलेल्या भीमराव धोंडे यांनी मधल्या काळात ‘बंदा’ या चित्रपटात भूमिका साकारली़ ‘आई’ मालिकेतही त्यांनी काम केले़ ‘संघर्ष’ व ‘तहान’ या चित्रपटांची निर्मितीही त्यांनी केली़ राजकारणाबरोबरच अभिनयाचे अंग जपताना त्यांनी वास्तवातही मोठ्या संघर्षातून विधानसभा गाठत ‘नायक’ असल्याचे सिध्द केले़

Web Title: Out of 'Badpatch'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.