छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६५ हजारांपैकी ४९ हजार विद्यार्थी प्रथम श्रेणीत

By राम शिनगारे | Published: May 28, 2024 11:58 AM2024-05-28T11:58:52+5:302024-05-28T11:59:21+5:30

दहावीच्या निकालातील यश; २७ हजार विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण

Out of 65 thousand students in Chhatrapati Sambhajinagar district, 49 thousand students in first class | छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६५ हजारांपैकी ४९ हजार विद्यार्थी प्रथम श्रेणीत

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६५ हजारांपैकी ४९ हजार विद्यार्थी प्रथम श्रेणीत

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा सोमवारी निकाल जाहीर झाला. या निकालात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९२७ शाळांमधील ६५ हजार ८०५ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी ६२ हजार ८५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याची टक्केवारी ९५.५१ टक्के एवढी असून, ६० टक्क्यांहून अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४९ हजार २६१ एवढी असल्याची माहिती माध्यमिकचे शिक्षणाधिकारी मधुकर देशमुख यांनी दिली. त्यात ७५ टक्क्यांहून अधिक गुण घेत डिस्टिंक्शनमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही २७ हजार ६४४ एवढी आहे.

विभागीय शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर केला. त्यामध्ये विभागात छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा दुसरा आला आहे. बीड जिल्ह्याने प्रथम स्थान पटकावले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड तालुक्याचा सर्वाधिक ९७.७४ टक्के एवढा निकाल लागला. सर्वांत कमी खुलताबाद तालुक्याचा निकाल ९३.९६ टक्के लागला. जिल्ह्याचा निकाल ९५.५१ टक्के लागलेला असतानाच मागील वर्षी हाच निकाल ९३.५८ टक्के होता. त्यामुळे मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालाचा टक्का वाढला.

वेगवेगळ्या प्रकारांतील विद्यार्थ्यांचे प्रस्ताव
दहावीच्या परीक्षा देतानाच क्रीडासह प्रकार विद्यार्थ्यांना गुण देण्यात येतात. जिल्ह्यातून दिव्यांगांचे २०८ प्रस्ताव विभागीय मंडळाला मिळाले. संपूर्ण विभागांतून ७५१ प्रस्ताव आले. चित्रकलेमध्ये जिल्ह्यातून ४ हजार २१० प्रस्ताव आले. त्यापैकी गुणदानासाठी ४ हजार ३७ प्रस्ताव पात्र ठरले. १७३ अपात्र ठरले. विभागात चित्रकलेचे एकूण १४ हजार ७३० प्रस्ताव दाखल होते. त्यापैकी १४ हजार १३१ प्रस्ताव मंजूर झाले. खेळाडू स्काऊट गाईडचे ८९९ प्रस्ताव आले. त्यापैकी ८५९ प्रस्ताव मंजूर झाले. विभागात एकूण ३ हजार १२ प्रस्ताव आले. त्यापैकी २ हजार ९०१ प्रस्ताव मंजूर झाले.

१४९ गैरप्रकरणांची चौकशी
छत्रपती संभाजीनगर विभागातील पाच जिल्ह्यांत १४९ गैरमार्गप्रकरणी विभागीय मंडळाने चौकशी केली. त्यापैकी परीक्षा सुरू असताना ८७ आणि परीक्षानंतर ६२ गैरप्रकार उघडकीस आले होते. त्या संपूर्ण प्रकरणांची चौकशी करण्यात आली. त्यात ६१ प्रकरणांत विद्यार्थ्यांच्या विषयाचा निकाल रद्द केला, तर ८८ प्रकरणातील विद्यार्थी निर्दोष सोडण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील दहावीच्या निकालाची आकडेवारी
तालुका..................परीक्षार्थी..........डिस्टिंक्शन........प्रथम श्रेणी........द्वितीय
श्रेणी.......उत्तीर्ण........एकुण...........टक्केवारी
छ.संभाजीनगर........२७,१५१.............९६८०.............९३४६..............५५५५..............१३०९........२५,८९०..........९५.३५
गंगापूर....................८८४४................३४७२.............२८७४..............१५७१..............४३९..........८३५६.............९४.४८
कन्नड......................५७१२................२३१०.............१९८१.................९५३................१७५...........५४१९............९५.५७
खुलताबाद..............२४०२.................१०३५.............७६७.................३५८................९७..............२२५७............९३.९६
पैठण.....................५७८७.................२६१६.............१७६२...............८८४................२०७............५४६९.............९४.५०
सिल्लोड..................६५१९.................३९८६.............१८०२................५२३................६१...............६३७२.............९७.७४
सोयगाव..................१५८४.................६०३................६११...................२५८................३७..............१५०९.............९५.२६
वैजापूर....................४७०२................२१२१............१६११..................६७९................१०५.............४५१६..............९६.०४
फुलंब्री.....................३१४६.................१८२१.............८६३..................३३६.................४८..............३०६८...............९७.५२
एकूण......................६५,८०५..............२७,६४४.........२१,६१७............११,११७.............२४७८.........६२,८५६...........९५.५१

Web Title: Out of 65 thousand students in Chhatrapati Sambhajinagar district, 49 thousand students in first class

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.