कम्बाइन बँकर्सची मनपावर निसटती मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 01:00 AM2017-11-18T01:00:43+5:302017-11-18T01:01:44+5:30

औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या व्हेरॉक करंडक औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत कम्बाइन बँकर्स संघाने मनपा संघावर ४ चेंडू व २ गडी राखून चित्तथरारक विजय मिळवला. दुसºया सामन्यात उदय पांडेच्या तडाखेबंद ९५ धावांच्या बळावर कॉस्मो फिल्म संघाने एसजीएसटी संघावर ४१ धावांनी मात केली.

   Outcome of Combine Bankers | कम्बाइन बँकर्सची मनपावर निसटती मात

कम्बाइन बँकर्सची मनपावर निसटती मात

googlenewsNext


औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या व्हेरॉक करंडक औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत कम्बाइन बँकर्स संघाने मनपा संघावर ४ चेंडू व २ गडी राखून चित्तथरारक विजय मिळवला. दुसºया सामन्यात उदय पांडेच्या तडाखेबंद ९५ धावांच्या बळावर कॉस्मो फिल्म संघाने एसजीएसटी संघावर ४१ धावांनी मात केली.
सकाळच्या सत्रात उदय पांडे याच्या ६३ चेंडूंतील १२ चौकार व ३ षटकारांसह फटकावलेल्या ९५ धावांच्या बळावर कॉस्मो फिल्मने फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १९६ धावा ठोकल्या. हसन अस्लम याने ३० चेंडूंत ३४ धावा केल्या. एसजीएसटी संघाकडून अशोक सूर्यवंशी याने २, तर विशाल गवळे, अभय कमरकर व धनंजय देशमुख यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात एसजीएसटी संघ ५ बाद १५५ पर्यंत मजल मारू शकला. त्यांच्याकडून विशाल गवळे याने ३५ चेंडूंत ८ चौकार व एका षटकारासह ५५ धावा केल्या. सय्यद शुजाने ३९ व अभय करमरकरने नाबाद २३ धावा केल्या. कॉस्मो फिल्मकडून सतीश जामखेडकर, उदय पांडे, महेंद्र ढगे, विराज चितळे व श्रीकांत वाघमारे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
दुसºया सामन्यात मनपाने प्रथम फलंदाजी करीत २० षटकांत ७ बाद १२१ धावा केल्या. त्यांच्याकडून सचिन लव्हेराने ६ चौकारांसह ३७ व राम प्रधानने नाबाद १७ व मोहमद इम्रान व कर्मवीर लव्हेरा यांनी प्रत्येकी १५ धावा केल्या. कम्बाइन बँकर्सकडून दिनेश कुंटे व शेख हबीब यांनी प्रत्येकी २, तर प्रदीप जगदाळे व मिलिंद पाटील यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात दिनेश कुंटेच्या ३१ चेंडूंतील ५ चौकारांसह जिगरबाज नाबाद ३७ धावांच्या खेळीच्या बळावर कम्बाइन बँकर्सने ८ गडी गमावून १९.२ षटकांत १२२ धावा करीत विजय मिळवला. प्रदीप जगदाळेने १८ चेंडूंत ३ चौकार, २ षटकारांसह २७, मिलिंद पाटीलने ११ व महेंद्रसिंग कानसाने नाबाद ९ धावा केल्या. मनपाकडून राम प्रधान, रईस अहमद व अल्ताफ यांनी प्रत्येकी २, तर प्रवीण क्षीरसागरने १ गडी बाद केला.

Web Title:    Outcome of Combine Bankers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.