मोहरमच्या ऐतिहासिक पंज्यांची चोरी, ४०० वर्षांपासून हिंदू-मुस्लिमांसाठी होते श्रद्धास्थान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 09:01 PM2023-11-07T21:01:52+5:302023-11-07T21:02:17+5:30

ऐतिहासिक धार्मिक पंजे चोरीस गेल्यामुळे हिंदू मुस्लिम नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Outrageous! The historic theft of Muharram's claws has been a place of pilgrimage for Hindus and Muslims for over 400 years | मोहरमच्या ऐतिहासिक पंज्यांची चोरी, ४०० वर्षांपासून हिंदू-मुस्लिमांसाठी होते श्रद्धास्थान

मोहरमच्या ऐतिहासिक पंज्यांची चोरी, ४०० वर्षांपासून हिंदू-मुस्लिमांसाठी होते श्रद्धास्थान

पैठण: मोहरम मिरवणुकीत मिरवले जाणारे ऐतिहासिक प्राचीन पितळी पंजे चोरीस गेल्याची घटना मंगळवारी पैठण शहरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून. गेल्या चारशे वर्षांपासून मोहरम सणाला सवारी मिरवणुकीत श्रध्देने सदर पंजे मिरवले जात असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

पैठण शहरात हताई भागातील एका घरात ठेवण्यात आलेले पितळी पंजे चोरीस गेल्याचे म़गळवारी समोर आले. या पंजाची किंमत दीड लाखाच्या आसपास असल्याची मुस्लिम बांधवात चर्चा आहे. या बाबत पैठण पोलिस ठाण्यात ताहेर अली यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. या घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक प्रकाश वानोळे, सादिक धांडे, खलील धांडे,संजय कस्तुरे, संजय साळुंके, जमील शेख, अफरोज वड्डे, अब्दुल शेख, लाला धांडे आदीनी घटनास्थळी धाव घेतली. 

मोहरमचे पितळी पंजे ऐतिहासिक असून मोहरमच्या मिरवणुकीत सवारी मध्ये यांचा समावेश असतो. विशेष म्हणजे, या पंजाचे हिंदू -मुस्लिम मोठ्या श्रद्धेने दर्शन घेत. ऐतिहासिक धार्मिक पंजे चोरीस गेल्यामुळे हिंदू मुस्लिम नागरिकात संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी भेट देऊन पाहणी केली.

Web Title: Outrageous! The historic theft of Muharram's claws has been a place of pilgrimage for Hindus and Muslims for over 400 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.