बाहेर उन्हाचा तर घरात महागाईचा भडका; भाववाढीने शहरवासीयांचा दररोजचा खर्च वाढला २८ लाखांनी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 01:18 PM2022-03-23T13:18:48+5:302022-03-23T13:19:46+5:30

नवीन वर्षात पहिल्यांदाच २२ मार्च रोजी थेट ५० रुपयांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहेत.

Outside, it is hot, and at home, inflation is also high; With the increase in prices, the daily expenses of the city dwellers have increased by 28 lakhs | बाहेर उन्हाचा तर घरात महागाईचा भडका; भाववाढीने शहरवासीयांचा दररोजचा खर्च वाढला २८ लाखांनी

बाहेर उन्हाचा तर घरात महागाईचा भडका; भाववाढीने शहरवासीयांचा दररोजचा खर्च वाढला २८ लाखांनी

googlenewsNext

- प्रशांत तेलवाडकर

औरंगाबाद : दूधापाठोपाठ मंगळवारपासून (दि. २२) घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेल एवढेच नव्हे तर सीएनजीच्या दरातही वाढ झाली आहे. याचा अंतिम फटका ग्राहकांच्या खिशाला बसणे सुरू झाले. या दरवाढीने गेल्या २४ तासांपासून शहरवासीयांच्या खिशातून दररोज अतिरिक्त २८ लाख रुपये काढून घेतले जाणार आहेत.

घरगुती गॅस महागला
नवीन वर्षात पहिल्यांदाच २२ मार्च रोजी थेट ५० रुपयांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहेत.
महिना २०२२ घरगुती गॅस             व्यावसायिक गॅस
जानेवारी ९०८.५० रु             २०३५ रु
फेब्रुवारी ९०८.५० रु             १९४३.५० रु
मार्च             ९५८.५० रु             २०४१ रु

आजघडीला १० लाख घरगुती गॅस सिलिंडरधारक आहेत. ५० रुपये भाव वाढल्याने महिन्याकाठी ५ कोटी तर दररोज १७ लाख रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड ग्राहकांना सहन करावा लागणार आहे. तर व्यावसायिक गॅस सिलेंडरमागे ९३.५० रुपये वाढले.

पेट्रोल, डिझेल, सीएनजीमध्ये वाढ
पेट्रोल, डिझेल, सीएनजीमध्ये दररोज ५ लाख ४० हजार जास्त द्यावे लागत आहेत. पेट्रोल व डिझेलचे भाव लीटरमागे अनुक्रमे ८५ पैसे व ८६ पैशांची मंगळवारी वाढ झाली आहे. तर सीएनजी किलोमागे २ रुपयांनी महागला आहे.

महिना २०२२ पेट्रोल (लीटर)             डिझेल सीएनजी (किलो)
जानेवारी             १११.६६ रु             ९५.८२ रु             ७९.९५ रु
फेब्रुवारी             १११.६६ रु             ९५.८२ रु             ७९.९५ रु
२२ मार्च             ९५८.५० रु             ९६.६८ रु             ८१.९५ रु

दररोज शहरात अडीच लाख लीटर पेट्रोल व डिझेल दीड लाख लीटर, तर सीएनजी २० हजार किलो विकले जाते. तिन्ही मिळून दररोज वाहनधारकांच्या खिशातून ५२,२५०० रुपये जास्त जात आहेत.

तीन लाख लीटर दुधाचा खप
शहरात लीटरमागे २ रुपयांनी दूध महागले आहे. सध्या पाकीटमधील दूध कमीत कमी ४८ रुपये लीटरने विकले जाते.
महिना            रुपये (लीटर)
जानेवारी ४६ रु.
फेब्रुवारी ४६ रु.
मार्च             ४८ रु.

शहरात दररोज तीन लाख लीटर दुधाची विक्री होते. यात पाकीट व सुट्या दुधाचा समावेश आहे. दोन रुपयांनी दूध वाढल्याने दररोज ६ लाख रुपये शहरवासीयांच्या खिशातून जास्तीचे जात आहेत.

दुधाचा पुरवठा घटला
दुधाचा पुरवठा घटला आहे. तसेच पशुखाद्य महागले आहे. यामुळे आम्ही गोपालकांना एका लीटरमागे १ रुपया वाढून दिला आहे. परिणामी ग्राहकांना लीटरमागे २ रुपये जास्तीच्या दराने दूध खरेदी करावे लागत आहे.

ग्राहकांना, वितरकांनाही फटका
जसजसे पेट्रोल-डिझेलचे भाव वाढतात तसा ग्राहकांना फटका बसतोच, पण वितरकांची गुंतवणूक वाढते व कमिशनमध्ये मात्र वाढ होत नाही. डिझेल शहराबाहेर जास्त विकले जाते. ई-वाहने व सीएनजीचा परिणामही पेट्रोल, डिझेलवर होऊ लागला आहे.
- अखिल अब्बास, सचिव, पेट्रोलियम डिलर्स असोसिएशन

Web Title: Outside, it is hot, and at home, inflation is also high; With the increase in prices, the daily expenses of the city dwellers have increased by 28 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.