थकबाकी दिली; शस्त्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 10:59 PM2019-02-09T22:59:34+5:302019-02-09T22:59:52+5:30
ब्ल्यू क्रॉस या संस्थेने थकबाकी मिळत नसल्यामुळे कुत्रे पकडून त्यांच्यावर नसबंदी शस्त्रक्रिया करण्याचे काम बंद केले होते.
औरंगाबाद : ब्ल्यू क्रॉस या संस्थेने थकबाकी मिळत नसल्यामुळे कुत्रे पकडून त्यांच्यावर नसबंदी शस्त्रक्रिया करण्याचे काम बंद केले होते.
मनपा लेखा विभागाने ८ लाख रुपयांची थकबाकी दिल्यानंतर शनिवारपासून कुत्रे पकडणे आणि शस्त्रक्रिया करण्याचे काम संस्थेने सुरू केले आहे. पुणे येथील ब्ल्यू क्रॉस या संस्थेला मनपाने कुत्रे पकडणे व शस्त्रक्रिया करण्याचे काम दिले. रोज ५० कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट संस्थेला देण्यात आले होते. मात्र दोन महिन्यांचे पैसे थकल्याने संस्थेने बुधवारपासून काम बंद केले होते. शुक्रवारच्या स्थायी समिती बैठकीत सदस्य सायराबानो यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर लेखा विभागाने संस्थेला बिल अदा केले.