विमानतळ विस्तारीकरणाची धाव ६०० कोटींकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:54 AM2017-10-24T00:54:02+5:302017-10-24T00:54:02+5:30
चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ विस्तारीकरण प्रकल्पाने २०० कोटींहून ६०० कोटींपर्यंत धाव घेतली आहे, अशी माहिती वरिष्ठ प्रशासकीय सूत्रांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ विस्तारीकरण प्रकल्पाने २०० कोटींहून ६०० कोटींपर्यंत धाव घेतली आहे, अशी माहिती वरिष्ठ प्रशासकीय सूत्रांनी दिली. एक वर्षापासून विमानतळ विस्तारीकरणाबाबत शासन दरबारी फक्त बैठका झाल्या आहेत. याबाबत काहीही निर्णय झाला नाही; मात्र प्रकल्प खर्चाचा आकडा ६०० कोटींपर्यंत गेला.
प्रकल्पाचा खर्च वाढल्यामुळे आणि भूसंपादनाबाबत निर्णय होत नसल्यामुळे विमानतळ विस्तारीकरणाची कामे रेंगाळली आहेत. विस्तारीकरण प्रकरणात उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये वित्त विभागाचे सचिव, सिडको प्रशासक, एअरपोर्ट अॅथॉरिटीचे सदस्य आहेत.
१९७२ साली सिडकोने मुकुंदवाडी, मूर्तिजापूर येथील शेतक-यांच्या जमिनीवर विमानतळाचे आरक्षण टाकल्यानंतर वाटाघाटीने १९९४ साली जमिनीचा ताबा घेतला. भूसंपादन सिडकोने केले, मात्र मोबदल्यावर आजपर्यंत वाद सुरू आहे.