हॉटेलचे ग्राहक पळविल्याचा आरोप; वेटरसह चार जणांना लोखंडी रॉडने मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 17:11 IST2025-02-12T17:10:28+5:302025-02-12T17:11:20+5:30

याबाबत एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

over Hotel customers Four people including waiter beaten with iron rod | हॉटेलचे ग्राहक पळविल्याचा आरोप; वेटरसह चार जणांना लोखंडी रॉडने मारहाण

हॉटेलचे ग्राहक पळविल्याचा आरोप; वेटरसह चार जणांना लोखंडी रॉडने मारहाण

वाळूज महानगर : हॉटेल व्यवसायातील स्पर्धेतून वेटरसह अन्य चार जणांना लोखंडी रॉडने गंभीर मारहाण करून जखमी केल्याची घटना रविवारी रात्री घडली. दोन गटांमध्ये ही हाणामारी झाली.

याबाबत एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी वेटर बाबासाहेब शेनफड्डू वानखेडे (२१, रा. बजाजनगर) यांनी शहरातील रुग्णालयात आयसीयूत उपचार घेताना वाळूज एमआयडीसी पोलिसांना जबाब दिला. त्यांनी सांगितले की, ते हॉटेल योगराज (प्रताप चौक) येथे आठ महिन्यांपासून वेटर आहेत. रविवारी रात्री ११:३० वाजता हॉटेल बंद करून ते आणि समाधान पाटील, कृष्णा पाटील व हॉटेल मालक नानासाहेब गलांडे असे चौघे जण हॉटेलसमोर उभे असताना सफारी कार (एमएच २० - बीए ०७००) ही जवळ थांबली. गाडीत राजयोग हॉटेलचे मालक राजेंद्र शिंगाडे हे होते. त्यांनी नानासाहेब गलांडे यांना सोबत नेले. शिंगाडे यांनी आम्हा कामगारांना ‘तुमचा कार्यक्रम करतो,’ अशी धमकी दिली. नंतर पाच ते दहा मिनिटांत दुसरी कार आली. त्यातील रोहित शिंगाडे, रोहन शिंगाडे यांच्याजवळ लोखंडी सळया होत्या. रोहित म्हणाला, “तुमच्या मालकाचा गेम झाला आहे. तुम्ही आमचा हॉटेलचा धंदा बंद पाडला आहे,” असे म्हणून सळईने बाबासाहेब याला बेदम मारहाण केली.

डोक्याला गंभीर जखम..
बाबासाहेब यांनी सांगितले की, वानखेडे खाली पडल्यावर त्यांनी माझ्या डोक्यात सळईने मारहाण केली. सचिन देशमाने हा मोटारसायकलवर तेथे आला. त्याला सुद्धा रोहन व रोहित शिंगाडे यांनी सळईने मारून गंभीर जखमी केले व ते तेथून त्यांची कार घेऊन निघून गेले. त्यानंतर तेथे जमा झालेल्या लोकांनी वानखेडे व बाबासाहेबला घाटी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर मालक नानासाहेब गलांडे यांनी खासगी हॉस्पिटलमध्ये हलविले. वानखेडे व बाबासाहेब यांना डोक्याला गंभीर जखम असल्याने चौदा ते पंधरा टाके पडले आहेत. तपास सहायक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे करत आहेत.

Web Title: over Hotel customers Four people including waiter beaten with iron rod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.