कोरोनाच्या वर्षभरातील २० टक्के रुग्णांची गेल्या ८ दिवसांतच भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:05 AM2021-03-25T04:05:42+5:302021-03-25T04:05:42+5:30

औरंगाबाद जिल्ह्यात १५ मार्च २०२० रोजी पहिल्या कोरोना रुग्णाचे निदान झाले होते. जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावाला नुकतेच वर्ष पूर्ण ...

Over the past 8 days, 20 percent of coronary heart disease patients have died | कोरोनाच्या वर्षभरातील २० टक्के रुग्णांची गेल्या ८ दिवसांतच भर

कोरोनाच्या वर्षभरातील २० टक्के रुग्णांची गेल्या ८ दिवसांतच भर

googlenewsNext

औरंगाबाद जिल्ह्यात १५ मार्च २०२० रोजी पहिल्या कोरोना रुग्णाचे निदान झाले होते. जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावाला नुकतेच वर्ष पूर्ण झाले. या वर्षभरात म्हणजे १५ मार्चपर्यंत जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही ५८ हजार ८२९ झाली होती. फेब्रुवारीपासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढले. दररोज उच्चांकी रुग्णसंख्येची भर पडत आहे. त्यात गेल्या आठ दिवसांत मोठी भर पडली. त्यामुळे औरंगाबादकरांची चिंता वाढत आहे. नागरिकांना खाटा मिळविण्यासाठी भटकंती करण्याची वेळ ओढावत आहे. कोरोनाची लागण होऊन उपचार घेण्याची, बेडसाठी भटकंती करण्याची वेळ येऊ नये, यासाठी मास्कचा वापर करणे, वारंवार हात धुणे आणि सोशल डिस्टन्सचे पालन करावे, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

---

१५ मार्च २०२० ते १५ मार्च २०२१ -एकूण रुग्ण ५८, ८२९

१६ मार्च ते २३ मार्चदरम्यान नवे रुग्ण- ११ हजार ७२२

-------

जिल्ह्यात ८ दिवसांत वाढलेले रुग्ण

तारीख- नवे रुग्ण

२३ मार्च-१७९१

२२ मार्च-१४०६

२१ मार्च-१४३२

२० मार्च-१६७९

१९ मार्च-१२५१

१८ मार्च-१५५७

१७ मार्च-१३३५

१६ मार्च-१२७१

Web Title: Over the past 8 days, 20 percent of coronary heart disease patients have died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.