जिल्ह्यात कोरोना मृत्यूवर मात, २१ रुग्णांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:04 AM2021-09-16T04:04:27+5:302021-09-16T04:04:27+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात २१ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. यात मनपा हद्दीतील ४ आणि ग्रामीण भागातील १७ ...
औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात २१ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. यात मनपा हद्दीतील ४ आणि ग्रामीण भागातील १७ रुग्णांचा समावेश आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही आणि बुधवार हा सप्टेंबरमधील पहिलाच कोरोनामुक्त दिवस ठरला. उपचार घेऊन २० रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
जिल्ह्यात सध्या २३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्या १ लाख ४८ हजार ४१६ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४४ हजार ६२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३ हजार ५५७ रुग्णांचा मृत्यू झाला. मनपा हद्दीतील ८ आणि ग्रामीण भागातील १२ अशा २० रुग्णांना बुधवारी सुट्टी देण्यात आली. सप्टेंबर महिन्यात १४ दिवसांत २६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये कधी दिवसभरात एक, कधी दिवसभरात ४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र, बुधवार जिल्ह्यासाठी दिलासादायक ठरला. दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. शहरात निदान होणाऱ्या रुग्णांची संख्याही एकेरी आकड्यात आहे. ग्रामीण भागात वैजापूर तालुक्यात दरराेज सर्वाधिक रुग्ण आढळणे सुरूच आहे.
------
मनपा हद्दीतील रुग्ण
गौतमनगर १, घाटी परिसर १, अन्य २
ग्रामीण भागातील रुग्ण
औरंगाबाद १, गंगापूर ४, खुलताबाद १, वैजापूर ९, पैठण २