सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्याची कोरोना मृत्यूवर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:04 AM2021-08-19T04:04:26+5:302021-08-19T04:04:26+5:30
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्याने सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी कोरोना मृत्यूवर मात केली. गेल्या २४ तासांत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू ...
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्याने सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी कोरोना मृत्यूवर मात केली. गेल्या २४ तासांत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तर दिवसभरात शहरात ६ आणि ग्रामीण भागात १०, अशा १६ कोरोना रुग्णांची वाढ झाली.
जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता. जिल्ह्यात सध्या १७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाची एकूण रुग्णसंख्या एक लाख ४७ हजार ७९९ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४४ हजार १०३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत तीन हजार ५२३ रुग्णांचा मृत्यू झाला. मनपा हद्दीतील ८ आणि ग्रामीण भागातील १० अशा १८ रुग्णांना बुधवारी सुट्टी देण्यात आली.
मनपा हद्दीतील रुग्ण
एन-७ येथे १, किलेअर्क २, बीड बायपास २, अन्य १
ग्रामीण भागातील रुग्ण
औरंगाबाद १, गंगापूर ३, वैजापूर ४, पैठण २
-------
कोरोनामुक्तीसाठी २८ दिवसांचा निकष
एखाद्या शहर, गावात सलग २८ दिवस एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही अथवा कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही तर तो ग्रीन झोन म्हणून जाहीर केला जातो. त्यानुसार ते शहर किंवा गाव कोरोनामुक्त ठरते. यानुसार काही दिवसांपूर्वीच धुळे शहर राज्यातील पहिले कोरोनामुक्त शहर ठरले. औरंगाबादकर कधी कोरोनामुक्त होतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.