भर पावसात चिखल तुडवीत गेले अन् आरोपीला बैलगाडीतून आणले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 12:55 AM2017-08-21T00:55:00+5:302017-08-21T00:55:00+5:30

: दरोडा, चोरी, खून, लूटमारसारखे गुन्हे करणाºया नारायण ऊर्फ नारायण भारत पवार (२५, रा. नागझरी, ता. गेवराई) या सराईत गुन्हेगाराच्या स्थानिक गुन्हे शाखा व दरोडा प्रतिबंधक पथकाने मुसक्या आवळल्या.

 Overflowing the mud hit the house and brought the accused out of the bullock cart | भर पावसात चिखल तुडवीत गेले अन् आरोपीला बैलगाडीतून आणले

भर पावसात चिखल तुडवीत गेले अन् आरोपीला बैलगाडीतून आणले

googlenewsNext

कारवाई : बापाला मारणाºया दरोडेखोर नाºयाच्या आवळल्या मुसक्या
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : दरोडा, चोरी, खून, लूटमारसारखे गुन्हे करणाºया नारायण ऊर्फ नारायण भारत पवार (२५, रा. नागझरी, ता. गेवराई) या सराईत गुन्हेगाराच्या स्थानिक गुन्हे शाखा व दरोडा प्रतिबंधक पथकाने मुसक्या आवळल्या. विशेष म्हणजे ही कारवाई पडत्या पावसात व ३ कि.मी. चिखल तुडवीत रेवकी देवकी परिसरातील गोदावरी नदीपात्रात शनिवारी रात्री करण्यात आली. त्यानंतर त्याला जीपपर्यंत बैलगाडीत टाकून आणण्यात आले.
नाºया हा त्याचा भाऊ शहाद्या व इतर साथीदारांसोबत गेवराई, चकलांबा, तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोºया, दरोडे, लूटमार करायचा. त्याच्यावर ठिकठिकाणी गुन्हेही दाखल आहेत. त्याच्या अटकेसाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे दिनेश आहेर, सचिन पुंडगे, दरोडा प्रतिबंधक पथकाचे श्रीकांत उबाळे यांनी सापळा रचून शनिवारी रात्री गेवराई तालुक्यातील रेवकी देवकी परिसरात नाºयाच्या मुसक्या आवळल्या.
नाºयाने बापाचाही काटा काढला होता. त्याची जामिनावर सुटका झाल्यानंतरही त्याने गुन्हेगारी सोडली नाही. शनिवारी तो लपून बसल्याची माहिती मिळताच ३० कर्मचाºयांचा ताफा चिखल तुडवीत नदीपात्रात पोहोचला अन् नाºयाच्या मुसक्या आवळल्या.

Web Title:  Overflowing the mud hit the house and brought the accused out of the bullock cart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.