आॅनलाईन सेवा पुस्तिका नोंदीसाठी शिक्षकांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 06:41 PM2018-11-01T18:41:15+5:302018-11-01T18:41:36+5:30
वाळूज महानगर : शिक्षण विभागाकडून ऐन सणासुदीच्या काळात शिक्षकावर आॅनलाईन सेवा पुस्तिकेच्या नोंदी करण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळी सणाच्या सुटीवर विरजण पडत असल्यामुळे शिक्षकांतून नाराजीचा सूर उमटत आहेत.
वाळूज महानगर : शिक्षण विभागाकडून ऐन सणासुदीच्या काळात शिक्षकावर आॅनलाईन सेवा पुस्तिकेच्या नोंदी करण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळी सणाच्या सुटीवर विरजण पडत असल्यामुळे शिक्षकांतून नाराजीचा सूर उमटत आहेत.
शासनातर्फे शिक्षकांच्या सेवा पुस्तिका आॅनलाईन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सेवा पुस्तिका अद्यावत ठेवण्याची जबाबदारी संबधित गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे असते. मात्र शिक्षकाचे सेवा पुस्तिकेचे रेकार्ड ठेवताना नोंदी अस्पष्ट असणे, सेवा पुस्तिका फाटणे अथवा गहाळ होण्याचे प्रकार वाढल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती. याचबरोबर सेवानिवृत्त होणाºया शिक्षकांनाही अडचणीचा सामना करावा लागत होता.
यासाठी शासनातर्फे शिक्षकांच्या सेवा पुस्तिकांच्या नोंदी आॅनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. या नोंदीसाठी शिक्षण विभागाने १० नोव्हेंबरची डेडलाईन दिली आहे. या संदर्भात गुरुवारी पंढरपूर केंद्रांतर्गत येणाºया १६ जिल्हा परिषद शाळांतील शिक्षक व मुख्याध्यापकासाठी कार्यशाळा घेण्यात आली.
केंद्रातंर्गत येणाºया १२६ शिक्षकांच्या सेवा पुस्तिकांची आॅनलाईन नोंदीची जबाबदारी दोन प्रशिक्षण प्राप्त शिक्षकावर सोपविली आहे. यावेळी मुख्याध्यापक प्रकाश दाणे, सुनिल चिपाटे, रमेश गिरी यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करुन त्यांच्या शंकाचे निरसन केले. कार्यशाळेला अप्पासाहेब दांडगे, प्रविण पांडे, हरिश्चंद्र रामटेके, भास्कर गोपाळ, संजय भोर, सचिन वाघ, एम.ए.पठाण आदींसह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.