डेक्कन ओडिसीने आलेल्या ज्येष्ठ पर्यटकांची जिद्द पाहून प्रवासी अवाक्

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 08:28 PM2018-02-22T20:28:08+5:302018-02-22T20:29:23+5:30

औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर रेल्वेकडून अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांबरोबर परदेशी पाहुण्यांचीही परीक्षाच घेतली जात आहे. रेल्वेस्टेशनवरील लिफ्ट बंद असल्याने प्रचंड त्रास सहन करून पादचारी पुलावरून ये-जा करण्याची कसरत डेक्कन ओडिसीने आलेल्या ज्येष्ठ पर्यटकांना करावी लागली.

Overseas Awakening, seeing the zeal of senior tourists visiting Deccan Odyssey | डेक्कन ओडिसीने आलेल्या ज्येष्ठ पर्यटकांची जिद्द पाहून प्रवासी अवाक्

डेक्कन ओडिसीने आलेल्या ज्येष्ठ पर्यटकांची जिद्द पाहून प्रवासी अवाक्

googlenewsNext

औरंगाबाद : औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर रेल्वेकडून अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांबरोबर परदेशी पाहुण्यांचीही परीक्षाच घेतली जात आहे. रेल्वेस्टेशनवरील लिफ्ट बंद असल्याने प्रचंड त्रास सहन करून पादचारी पुलावरून ये-जा करण्याची कसरत डेक्कन ओडिसीने आलेल्या ज्येष्ठ पर्यटकांना गुरुवारी (दि. २२) करावी लागली. पर्यटनस्थळी जाण्यासाठी ज्येष्ठ पर्यटकांची जिद्द पाहून इतर प्रवासीही क्षणभर अवाक् झाले. 

मॉडेल रेल्वेस्टेशनमध्ये समावेश असलेल्या औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर लाखो रुपये खर्चून प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोनवर ज्येष्ठ, अपंग प्रवाशांच्या सुविधेसाठी लिफ्टची सुविधा उभारण्यात आली; परंतु काही दिवसांपासून ही लिफ्ट नादुरुस्त आहे. याचा फटका  राजेशाही थाट, पंचतारांकित सोयीसुविधा आणि भव्यतेने नटलेल्या डेक्कन ओडिसी रेल्वेने आलेल्या ज्येष्ठ परदेशी पाहुण्यांनाही बसला. या रेल्वेने गुरुवारी दुपारी १ वाजता ८० पर्यटक शहरात आले. दिलीप खंडेराय आणि त्यांच्या कलापथकाने पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी टुरिझम प्रमोटर्स गील्ड औरंगाबादचे अध्यक्ष जसवंत सिंग यांची उपस्थिती होती. वेरूळ लेणीला जाण्यासाठी हे पर्यटक प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरून दादर्‍यावरून प्लॅटफॉर्म क्रमांक एककडे रवाना झाले. त्यावेळी एका ज्येष्ठाला चालणेही अशक्य होते; परंतु लिफ्ट बंद असल्याने इतरांचा आधार घेऊन या ज्येष्ठ पर्यटकास पादचारी पुलावरून उतरताना चांगलीच कसरत करावी लागली. लिफ्ट लवकरच दुरुस्त होणार असल्याचे रेल्वेच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

Web Title: Overseas Awakening, seeing the zeal of senior tourists visiting Deccan Odyssey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.