मालक गावी जाताच लुटले अख्खे कापड दुकान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 01:13 AM2017-12-17T01:13:50+5:302017-12-17T01:13:54+5:30
कापड दुकान भाड्याने घेऊन त्यात सुमारे बारा ते पंधरा लाखांचा माल भरल्यानंतर मालक बहिणीच्या लग्नासाठी उत्तर प्रदेशात जाताच सात जणांनी दुकानातील संपूर्ण सामान लुटल्याची घटना सहा महिन्यांपूर्वी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : कापड दुकान भाड्याने घेऊन त्यात सुमारे बारा ते पंधरा लाखांचा माल भरल्यानंतर मालक बहिणीच्या लग्नासाठी उत्तर प्रदेशात जाताच सात जणांनी दुकानातील संपूर्ण सामान लुटल्याची घटना सहा महिन्यांपूर्वी घडली. याप्रकरणी कोर्टाच्या आदेशाने सिटीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
अश्विन ऊर्फ बंटी शिवकुमार जैस्वाल, राजकुमार ऊर्फ शिवकुमार जैस्वाल, मोहन बद्रीनारायण जैस्वाल, राजेश जैस्वाल, उमेश जैस्वाल, दोन महिलांचा आरोपींमध्ये समावेश आहे. याविषयी पोलिसांनी सांगितले की, तक्र ारदार याकूबखान रुबाब खान (रा. मंजूरपुरा) यांनी बुढीलेन येथील एक दुकान किरायाने घेतले आणि तेथे त्यांनी कापड दुकानाचे साहित्य आणून ठेवले.
बहिणीच्या लग्नासाठी २५ जून ते १५ जुलैदरम्यान त्यांना उत्तर प्रदेशात जावे लागले. गावाहून परत आल्यानंतर त्यांनी दुकानात जाऊन पाहिले असता त्यातील लोखंडी रॅक, काऊं टर, कागदपत्रे आणि रेडिमेड कपड्यांचा साठा चोरीला गेल्याचे समजले.
आरोपींनीच हे साहित्य लुटल्याची तक्रार त्यांनी सिटीचौक पोलिसांकडे नोंदविली होती. पोलिसांनी त्यांची फिर्याद नोंदवून न घेतल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली.
न्यायालयाच्या आदेशाने १५ डिसेंबर रोजी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू के ला.
विनापरवानगी निदर्शने केल्याप्रकरणी गुन्हा
औरंगाबाद : प्रशासनाची परवानगी न घेता अमेरिकेच्या निषेधार्थ डोनाल्ड ट्रम यांचा पुतळा दहन केल्याप्रकरणी जिन्सी ठाण्यात आंदोलनकर्त्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
पोहेकाँ. संदेश तात्याराव कीर्तिकर यांनी सरकारतर्फे फिर्याद नोंदविली. युसूफखान पटेल, मोहम्मद जुबेर, मौलाना अब्दुल रहेमान नदवी, मोहसीन खान, फय्याज खान, उमरेन चाऊस, सय्यद कलीम यांच्यासह १५ ते २० जणांचा आरोपींमध्ये समावेश आहे.
रिक्षाचालकास चाकूने भोसकले
जुन्या भांडणाच्या कारणावरून सय्यद राझकोद्दीन (रा. पटेलनगर, चिकलठाणा) यांना चाकूने भोसकून जखमी केल्याप्रकरणी एका जणाविरोधात क्रांतीचौक पोलिसांनी गुन्हा नोंदविला. ही घटना महावीर चौक ते क्रांतीचौक रस्त्यावर १२ डिसेंबर रोजी रात्री घडली. अश्फाक असे आरोपीचे नाव असून, त्याचा शोध पोलीस घेत आहेत.