भाडेवाढीसाठी जागा मालकाने पोस्ट कार्यालयाची वीज तोडली

By Admin | Published: March 20, 2016 12:39 AM2016-03-20T00:39:13+5:302016-03-20T00:48:07+5:30

बाळासाहेब जाधव , लातूर अर्ध्या शहराचा कारभार असलेल्या मित्रनगर भागातील पोस्ट कार्यालय हे भाड्याच्या जागेत आहे़ वाढीव भाडे मिळावे यासाठी जागा मालकाने

The owner of the office of the post office broke the rent for the hike | भाडेवाढीसाठी जागा मालकाने पोस्ट कार्यालयाची वीज तोडली

भाडेवाढीसाठी जागा मालकाने पोस्ट कार्यालयाची वीज तोडली

googlenewsNext


बाळासाहेब जाधव , लातूर
अर्ध्या शहराचा कारभार असलेल्या मित्रनगर भागातील पोस्ट कार्यालय हे भाड्याच्या जागेत आहे़ वाढीव भाडे मिळावे यासाठी जागा मालकाने पोस्ट कार्यालयातील प्रमुखांना नोटीसही दिल्यावरही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने शुक्रवारी जागा मालकाने पोस्ट कार्यालयाची वीज तोडली़ परिणामी, दोन दिवसांपासून मार्च एण्डमध्ये काम बंद पडले आहे़ दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठेही कार्यालयात पडून आहेत़
लातूर, उस्मानाबाद सर्कलमध्ये सर्वाधिक उलाढाल याठिकाणी होते़ भाडे तत्वावर पाच वर्षासाठी ही जागा घेतली होती़ महिन्याकाठी ९ हजार रुपये देण्यात येते़ वाढीव भाड्यासाठी जागा मालकाने मागणी केली होती़ त्यानंतर १६ हजार ७०० रुपये भाडे करण्यात आले तरीही प्रश्न मार्गी लागला नाही़ परिणामी जागा मालकाने शनिवारी मिटरही बंद केले असल्याने या कार्यालया अंतर्गत होणारी ७० लाखांची उलाढाल ठप्प झाली आहे़ तसेच विविध कामकाजासाठी येणाऱ्या ४५ हजार खातेदारांचीही गैरसोय झाली आहे़
सहाय्यक अधीक्षक संतोष रणखांब म्हणाले, करार संपल्यावर वाढीव भाडे मागितले होते़ यासंबंधी पाठपुराव केल्यावर १६ हजार ७०० रु़ भाडे देण्याचे ठरले़ परंतू तरीही जागा मालक त्या भाड्यावर समाधानी नसल्याने हा प्रकार झाला आहे़

Web Title: The owner of the office of the post office broke the rent for the hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.