पावणेपाच लाखांची वीजचोरी उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 12:59 AM2017-07-30T00:59:04+5:302017-07-30T00:59:04+5:30

अंबाजोगाई : उपविभागांतर्गत येणाºया गावात रोहित्र नादुरुस्ती व वीज गळतीचे प्रमाण वाढले आहे.

paavanaepaaca-laakhaancai-vaijacaorai-ughadakaisa | पावणेपाच लाखांची वीजचोरी उघडकीस

पावणेपाच लाखांची वीजचोरी उघडकीस

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : उपविभागांतर्गत येणाºया गावात रोहित्र नादुरुस्ती व वीज गळतीचे प्रमाण वाढले आहे. जुलै महिन्यात वीजचोरी विरुद्धची मोहीम महावितरणने हाती घेतली होती. त्यानुसार उपविभागामध्ये ५३ जणांची वीज चोरी पकडून त्यांच्यावर कारवाई म्हणून ४ लाख ७१ हजार ९२५ रुपये दंड लावण्यात आला. त्यापैकी ७२ हजार ६६६ रुपयांचा दंड आतापर्यंत वसूल झाला आहे.
उपविभागांतर्गत येणाºया गावांमध्ये व शहरामध्ये वीजचोरी व गळतीचे प्रमाण वाढल्यामुळे वीजचोरी रोखण्यासाठी उपकार्यकारी अभियंता राजेश अंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके नियुक्त करण्यात आली होती. या पथकात अभियंता अमोल मुंडे, अमोल जाधव, सुनील मस्के, शरद जाधव, कुलकर्णी यांनी घरगुती व व्यापारी मीटरच्या तपासण्या केल्या. यामध्ये मीटरमध्ये फेरफार केलेले, तारेवर आकडे टाकलेले, मीटरमध्ये येणाºया वायरला टॅपिंग केलेले ग्राहक आढळले.
लातूर परिमंडळ विभागाने विविध पोलीस ठाण्यामध्ये गांधीनगर भागात -८, नवाबवाडी घाटनांदूर -९, वालेवाडी, लिंबगाव तांडा-४ व दस्तगीरवाडी -४ अशा एकूण २५ ग्राहकांवर वीजचोरीचे गुन्हे नोंद केले आहेत. यानंतर वीजचोरी करणाºयांवर कडक मोहीम राबवून उपविभागातील वीजगळती व वीजचोरी संपुष्टात आणू, असे उपकार्यकारी अभियंता राजेश अंबेकर यांनी सांगितले.

Web Title: paavanaepaaca-laakhaancai-vaijacaorai-ughadakaisa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.