पदे १०, उमेदवार सव्वाचारशे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 12:37 AM2017-07-30T00:37:02+5:302017-07-30T00:37:02+5:30
नांदेड: महापालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत सुरू असलेल्या विविध कंत्राटी पदाच्या भरतीसाठी शनिवारी १० पदांसाठी ४२१ उमेदवारांनी मुलाखती दिल्या़ विशेष म्हणजे, या पदाच्या निवडीही महापालिकेने रात्री उशिरा जाहीर केल्या़
लोकमत न्यूज नेटवर्क

महापालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत विविध कंत्राटी पदासाठी २८ जुलैपासून थेट मुलाखती घेण्यात येत आहेत़ मुलाखतीसाठी राज्यभरातून उमेदवार येत आहेत़ आज शनिवारी परिचारिका, स्टाफ नर्स, मिश्रक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी मुलाखती पार पडल्या़ शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात मुलाखती घेण्यात येत आहेत़ शनिवारी परिचारिका पदाच्या ३ जागांसाठी २९५ उमेदवारांनी मुलाखती दिल्या़ तर स्टाफ नर्स पदाच्या २ जागासाठी ६८, एका मिश्रक पदाच्या जागेसाठी ३७ आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी २१ उमेदवारांनी हजेरी लावली होती़ आयुक्त गणेश देशमुख हे निवड समितीचे अध्यक्ष असून प्रशासन व विकास विभागाचे उपायुक्त, महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी सदस्य सचिव आहेत़ मुलाखतीसाठी परभणीच्या मुख्य वैद्यकीय अधिकाºयांनाही पाचारण करण्यात आले आहे़ सोमवारी लेखा विभागाच्या मुलाखती होणार आहेत़