एक मताच्या फरकाने मिळाले पाेळ यांना सभापतीपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:04 AM2021-06-05T04:04:31+5:302021-06-05T04:04:31+5:30

लासूर स्टेशन : बाजार समितीच्या सभापतीपदी रवींद्र बन्सीधर पोळ अवघ्या एका मताने विराजमान झाले. संभाजी पाटील डोणगावकर यांच्या ...

Pael won the chairmanship by a margin of one vote | एक मताच्या फरकाने मिळाले पाेळ यांना सभापतीपद

एक मताच्या फरकाने मिळाले पाेळ यांना सभापतीपद

googlenewsNext

लासूर स्टेशन : बाजार समितीच्या सभापतीपदी रवींद्र बन्सीधर पोळ अवघ्या एका मताने विराजमान झाले. संभाजी पाटील डोणगावकर यांच्या निधनाने हे पद रिक्त झाले होते. शुक्रवारी सभापतीपदाची निवड प्रक्रिया समितीच्या कार्यालयात दुपारी झाली. या निवडणुकीत कृष्णा पाटील डोणगावकर आणि शिवसेना समर्थकांची सरशी झाली.

कृष्णा पाटील डोणगावकर व शिवसेना गटातून सभापतीपदासाठी वाल्मीक चव्हाण यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, याच गटातूनच रवींद्र पोळ यांचा दुसरा, तर संदीप आढाव यांनीसुद्धा आपला अर्ज दाखल केला होता. एकाच गटातील तीन अर्ज दाखल झाल्याने कृष्णा पाटील डोणगावकर, शिवसेना गटात खळबळ उडाली होती. दुसरीकडे आ. प्रशांत बंब व किरण पाटील डोणगावकर यांच्या गटातून कडूबा हिवाळे यांनी अर्ज दाखल केला. मात्र हिवाळे यांनी अर्ज परत घेऊन आढाव यांचा अर्ज पुढे करण्यात आला. मात्र, वाल्मीक चव्हाण व रवींद्र पोळ यांच्या दोन्ही अर्जांमुळे बंब यांच्या गटाला फायदा होईल म्हणून वेळेवर रवींद्र पोळ यांना मतदान करण्याचे ठरविण्यात आले. कृष्णा पाटील डोणगावकर व शिवसेना गटाच्या रवींद्र पोळ यांना नऊ, तर आ. प्रशांत बंब व किरण पाटील डोणगावकर यांच्या गटाच्या संदीप आढाव यांना आठ मतदानावर समाधान मानावे लागले.

---

Web Title: Pael won the chairmanship by a margin of one vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.