प्रहार संघटनेची औरंगाबाद पंचायत समिती कार्यालयात तोडफोड; गटविकास अधिका-यांनाही धक्काबुक्की 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 07:25 PM2018-02-05T19:25:38+5:302018-02-05T19:26:15+5:30

ग्रामसेवक मुख्यालयी का राहात नाही, असा जाब विचारण्यासाठी गेलेले प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत गटविकास अधिकारी यांना धक्काबुक्की केली आणि कार्यालयातील खुर्च्यां अस्ताव्यस्त फेकल्या. ही घटना आज सकाळी साडेअकरा ते बारा वाजेच्या सुमारास पंचायत समिती कार्यालयात घडली. याप्रकरणी सिटीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. तर बीडीओने अपंग पदाधिकार्‍यांची कॉलर पकडून धक्काबुकी केल्याची तक्रार संघटनेने पोलिसांना दिली. 

Pahar organization's Aurangabad panchayat committee dissolved in office; Agitating Block Development Officer | प्रहार संघटनेची औरंगाबाद पंचायत समिती कार्यालयात तोडफोड; गटविकास अधिका-यांनाही धक्काबुक्की 

प्रहार संघटनेची औरंगाबाद पंचायत समिती कार्यालयात तोडफोड; गटविकास अधिका-यांनाही धक्काबुक्की 

googlenewsNext

औरंगाबाद : ग्रामसेवक मुख्यालयी का राहात नाही, असा जाब विचारण्यासाठी गेलेले प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत गटविकास अधिकारी यांना धक्काबुक्की केली आणि कार्यालयातील खुर्च्यां अस्ताव्यस्त फेकल्या. ही घटना आज सकाळी साडेअकरा ते बारा वाजेच्या सुमारास पंचायत समिती कार्यालयात घडली. याप्रकरणी सिटीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. तर बीडीओने अपंग पदाधिकार्‍यांची कॉलर पकडून धक्काबुकी केल्याची तक्रार संघटनेने पोलिसांना दिली. 

अपंगाचा ३ टक्के निधी खर्च करा आणि मुख्यालयी न राहणार्‍या ग्रामसेवकांवर कारवाई करा, या मागणीसाठी प्रहार अंपग क्रांती आंदोलन संघटनेने डिसेंबर महिन्यात औरंगाबाद पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन केले होते. त्यावेळी गटविकास अधिकारी एम.सी. राठोड यांनी संघटनेच्या मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतरही अनेक ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याचे संघटनेच्या निदर्शनास आले होते. यामुळे मुख्यालयी न राहणार्‍या ग्रामसेवकांवर काय कारवाई केली, तसेच अपंगासाठी असलेल्या ३ टक्के निधी खर्चाचे काय झाले याबाबत विचारणा करण्यासाठी संघटनेचे  तालुकाअध्यक्ष अमोल ढगे, प्रहार जनशक्ती पक्षाचे  जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे हे आज सकाळी साडेअकरा ते बारा वाजेच्या सुमारास पंचायत समिती कार्यालयात गेले. 

यावेळी गटविकास अधिकारी  एम.सी.राठोड यांच्यासोबत त्यांचा वाद झाला आणि वादाचे रुपांतर उग्र आंदोलनात झाला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी गटविकास अधिकारी यांना धक्काबुक्की केली आणि  कार्यालयातील खुर्च्यां अस्ताव्यस्त फेक ण्यास सुरवात केली. यामुळे उडालेल्या गोंधळाने तेथे हजर असलेल्या शिपायांसह अन्य कर्मचार्‍यांनीही आंदोलनकर्त्यांना कार्यालयाबाहेर हाकलून दिले. या घटनेची माहिती मिळताच सिटीचौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Web Title: Pahar organization's Aurangabad panchayat committee dissolved in office; Agitating Block Development Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.