पीक विमा योजनेस मुदतवाढ मिळालीच पाहिजे-चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:29 AM2017-07-31T00:29:59+5:302017-07-31T00:29:59+5:30
भोकर: तालुक्यात दिवशी येथे बँकेसमोर रांगेत शेतकºयाचा झालेला मृत्यू हा शासनाच्या नाकर्तेपणाचा व अयोग्य नियोजनाचा बळी असून अशा घटना रोखण्यासाठी राज्यभरात पीक विमा भरण्याची मुदत किमान दहा दिवसांनी वाढवून देणे गरजेचे आहे अशी आग्रही मागणी माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़अशोकराव चव्हाण यांनी केली़
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकर: तालुक्यात दिवशी येथे बँकेसमोर रांगेत शेतकºयाचा झालेला मृत्यू हा शासनाच्या नाकर्तेपणाचा व अयोग्य नियोजनाचा बळी असून अशा घटना रोखण्यासाठी राज्यभरात पीक विमा भरण्याची मुदत किमान दहा दिवसांनी वाढवून देणे गरजेचे आहे अशी आग्रही मागणी माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़अशोकराव चव्हाण यांनी केली़
भोकर येथे एसबीआय बँकेच्या बाहेर जमलेल्या शेतकºयांशी त्यांनी रविवारी संवाद साधला़ दिवशी बु़ येथील मयत शेतकरी रामा पोतरे यांच्या निवासस्थानी जाऊन खा. चव्हाण यांनी कुटुंबियांचे सांत्वन केले़ मुख्य रस्त्यावरील एसबीआय बँकेसमोर रविवारीही पीक विमा भरण्यासाठी शेतकºयांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या़ यावेळी खा. चव्हाण यांनी शेतकºयांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या़ पोलीस जीपवर चढून यावेळी त्यांनी शेतकºयांना आवाहन केले़ ते म्हणाले, बँकेच्या रांगेत शेतकºयाचा मृत्यू होणे दुर्देवी घटना आहे़ अशा घटना टाळण्यासाठी शासनाने पीक विमा भरण्याची मुदत वाढवायला पाहिजे़
राज्यभरात एकसारखीच परिस्थिती आहे़ वीजपुरवठा नाही, आॅनलाईनमध्ये अडचणी येत आहेत़ सरकारने योग्य नियोजन न करताच पीक विमा जाहीर केला़ अल्पावधीत शेतकºयांना बँकेच्या रांगेत उभे केले़ यापूर्वी अशाचप्रकारे नोटबंदी करुन जनतेला दोन महिने बँकेच्या रांगेत उभे राहायला लावले होते़ त्याहीवेळी निष्पाप नागरिकांचा नाहक बळी गेला़ आताही योग्य नियोजन होत नसल्याने शेतकºयांचा बळी जात आहे़ या ठिकाणी कोणतेही राजकारण करण्यासाठी आलो नसून जनतेची गैरसोय दूर व्हावी, अशी माझी भावना आहे़ जिल्हा प्रशासन व बँक व्यवस्थापनाने पीक विमा भरण्याचे योग्य नियोजन करावे़
शेतकºयांचे अर्ज आॅफलाईन पद्धतीने घ्यावेत़ बँकेत काऊंटर वाढवावेत़ शेतकºयांनीही संयमाने आपले अर्ज भरुन सहकार्य करावे़ यावेळी खा. चव्हाण यांनी बँक व्यवस्थापक के़एस़ कुलकर्णी यांच्याशी चर्चा करुन सूचनाही केल्या़ बँकेसमोर मोठा जनसमुदाय जमला होता़ त्यातील काही शेतकºयांनी रास्ता रोकोही केला़ त्यानंतर रांगेतील शेतकºयांनी शिस्तीने अर्ज भरल्यानंतर बँकेसमोरील गर्दी बरीच निवळली होती़