पीक विम्यासाठी शेतकरी रांगेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:19 AM2017-07-31T00:19:42+5:302017-07-31T00:19:42+5:30

परभणी : पीक विमा भरण्याची मुदत सोमवारी संपणार असल्याने पीक विम्याचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी रविवारी सुटीेच्या दिवशीही लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.पाथरीत चक्क पोलीस ठाण्यातून पीक विम्याचे प्रस्ताव स्वीकारण्यात आले. विशेष म्हणजे, सकाळी बँक उघडल्याबरोबर आपला नंबर लागावा म्हणून अनेक ठिकाणी शेतकरी रात्रभर रांग लावून होते.

paika-vaimayaasaathai-saetakarai-raangaetaca | पीक विम्यासाठी शेतकरी रांगेतच

पीक विम्यासाठी शेतकरी रांगेतच

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पीक विमा भरण्याची मुदत सोमवारी संपणार असल्याने पीक विम्याचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी रविवारी सुटीेच्या दिवशीही लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.पाथरीत चक्क पोलीस ठाण्यातून पीक विम्याचे प्रस्ताव स्वीकारण्यात आले. विशेष म्हणजे, सकाळी बँक उघडल्याबरोबर आपला नंबर लागावा म्हणून अनेक ठिकाणी शेतकरी रात्रभर रांग लावून होते.
२० जून ते ३१ जुलै या कालावधीत खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद, कापूस आदी पिकांच्या विम्याचे प्रस्ताव बँकेत दाखल करावयाचे आहेत. यासाठी बँकांसह महा ई-सेवा केंद्रावर हे अर्ज स्वीकारण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करुन दिली. परंतु, आॅनलाईन संकेतस्थळ वारंवार ठप्प पडत आहे. त्यातच बँकांनीही शेतकºयांच्या पीक विम्याचे प्रस्ताव न स्वीकारण्याचे धोरण अवलंबिले. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत.
गंगाखेड, पालम या ठिकाणी रास्ता रोको करुन आॅफलाईनने पीक विम्याचे अर्ज स्वीकारण्यासाठी जिल्हा प्रशासनाला भाग पाडले. शनिवारपासून बँकांमध्ये आॅफ लाईनने पीक विम्याचे प्रस्ताव दाखल करण्यास सुरुवात झाली. शेतकºयांची वाढती गर्दी पाहून जिल्हा प्रशासनाने रविवारीही बँका सुरु राहतील, असा आदेश काढला. परभणी शहरात जिल्हा मध्यवर्ती बँकेला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. तर राष्ट्रीयकृत बँकांमध्ये पीक विम्याचे प्रस्ताव दाखल करुन घेणे सुरळीत सुरू होते.
ल्लगंगाखेडात महिलांचा ठिय्या
गंगाखेड येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सायंकाळी ५.३० वाजेनंतर विमा स्वीकारणे बंद झाल्यानंतर शेतकरी, महिलांनी बँकेत ठिय्या मांडला. रात्री उशिरापर्यंतही पीक विमा घ्यावा यावर महिला ठाम होत्या. त्यामुळे बँकेचे गेट बंद करता आले नाही. गंगाखेड येथे पहाटेपासूनच शेतकºयांनी गर्दी केली होती. शहरातील सर्वच बॅकांमध्ये तीन पेक्षा अधिक टेबलवर विमा अर्ज स्वीकारण्यात आले. जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये पाच टेबलवरुन पीक विमा घेण्याचे काम सुरु होते. सायंकाळी ५ वाजेनंतरही शेतकºयांच्या रांगा लागल्या होत्या. सायंकाळी ५.३० वाजेनंतर बँक प्रशासनाने विमा स्वीकारणे बंद केले. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेत असलेल्या महिला शेतकºयांनी बँकेतच ठिय्या मांडला. रात्री उशिरापर्यंत महिला बँकेतच होत्या. तर बाहेर शेतकºयांनी काही वेळ रास्ता रोको केला. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
ल्लचारठाणा येथे गर्दी
ंिजंतूर तालुक्यातील चारठाणा येथील जिल्हा मध्यवर्ती बँक व महाराष्ट्र बँकेसमोर रविवारी पहाटेपासूनच शेतकºयांनी पीक विमा भरण्यासाठी रांगा लावल्या होत्या. अनेकवेळा शेतकºयांमध्ये गर्दीत घुसण्याचे प्रकार घडत असल्याने बाचाबाचीचे प्रकार घडले.
रांगेत थांबावे लागत असल्याने पाणी पिण्यासाठी शेतकºयांची गैरसोय होत होती. त्यामुळे आ.विजय भांबळे यांच्या वतीने पीक विमा भरणाºया शेतकºयांसाठी पाणी बॉटलचे ५० बॉक्स उपलब्ध करुन देण्यात आले होते. यासाठी राकाँचे नानासाहेब राऊत, सरपंच बी.जी. चव्हाण, माजी पं.स. सदस्य सलिमोद्दीन काजी, तहसीन देशमुख, दशरथ चव्हाण, नाना निकाळजे, इरफान इनामदार आदींनी पाणी वाटप केले.
ल्लपहाटेपासून बँकेसमोर रांगा
सेलू तालुक्यातील धामणगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर रविवारी पहाटेपासूृनच रांगा लावल्या होत्या. रेणाखळी, धामणगाव, राधे धामणगाव, पिंपळगाव, रोहा आदी गावातील शेतकरी पहाटेच दाखल झाले होते.
ल्लवालुरात पोलीस बंदोबस्त
सेलू तालुक्यातील वालूर येथे गोंधळ होत असल्याने पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.

Web Title: paika-vaimayaasaathai-saetakarai-raangaetaca

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.