कंबर ते तळपाय दुखणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:02 AM2021-07-11T04:02:26+5:302021-07-11T04:02:26+5:30

कंबरेच्या पाच नसा आहेत. त्या वेगवेगळी नसांची लक्षणे वेगवेगळी आहेत. मागील बाजूस दोन सांधे झिजायला लागले तर कंबरदुखी ...

Pain from the waist to the soles of the feet | कंबर ते तळपाय दुखणे

कंबर ते तळपाय दुखणे

googlenewsNext

कंबरेच्या पाच नसा आहेत. त्या वेगवेगळी नसांची लक्षणे वेगवेगळी आहेत.

मागील बाजूस दोन सांधे झिजायला लागले तर कंबरदुखी उद्‌भवते. जास्त काळ उभे राहिला तर मागच्या बाजूला वाकायला त्रास होतो. झोपताना एकाबाजूने दुसऱ्या बाजूला करवट बदलताना किंवा पायऱ्या चढताना कंबरदुखी जास्त प्रमाणात जाणवते.

पन्नाशीनंतरची कंबर दुखीचे प्रमुख लक्षण लंबर कॅनल स्टेनोसिस. कंबरदुखी प्रामुख्याने लक्षणे आहे ते लंबर कॅनल स्टेनोसिसचे आहे. पन्नाशीनंतर मनक्यामध्ये सुरू होते. लंबर म्हणजे कंबर व कॅनल म्हणजे पोकळी होय. पोकळीतील जागा हळूहळू निमुळती होऊ लागणे म्हणजे स्टेनोसिस म्हणतात. ही पोकळी निमुळती होऊन नसाला दाबू लागली तर त्याचे लक्षणे म्हणजे कंबरदुखी उद्‌भवते. जर चकतीमुळे होत असेल तर चकतीचे लक्षणे दिसून येतात. सांध्यामुळे होत असेल तर सांध्यामध्ये दुखणे सुरू होते. लंबर कॅनल स्टेनोसिस जर रुग्णाच्या एकाच बाजूला असेल तर त्यास लॅटल स्टेनोसिस म्हणतात. यामध्ये शरीराच्या एकाच बाजूचा पाय दुखणे, पाय जड पडणे, पायात मुंग्या येणे, जर कॅनल स्टेनोसिस चोहीबाजूने होत असेल तर मणक्याची समोर चकती घसरते, मागे सांधे जाड होत असतात, सांध्यामध्ये लिगामेंट (गादी) जाड होते. त्यात कॅल्शियम निर्माण होते. त्यामुळे पोकळी हळूहळू कमी होते. त्या पोकळीत ज्या नसावर दाब येणार. त्याच शास्त्रीय नाव आहे क्लाउडीकेशन्स हे न्युरोलॉजिकल क्लाऊडीकेशन्स असते. जेव्हा रुग्ण बसलेला असतो किंवा झोपलेला असतो तेव्हा त्याच्या पायात अजिबात वेदना होत नाहीत. जेव्हा तो चालायला लागतो त्यावेळेस त्यास पायात वेदना होण्यास सुरुवात होते. सुरुवातीला रुग्ण २ कि.मी. चालू शकतो, नंतर अंतर कमी होऊन १ कि.मी. त्यानंतर आणखी अंतर कमी होऊन अर्धामीटरपर्यंतच तो चालू शकतो. त्यानंतर त्यास १० ते १५ मिनीट बसावे लागते व तो रुग्ण पुन्हा तेवढचे अंतर चालू शकतो.

मणक्याच्या होणाऱ्या झिजेवर उपचार

लंबर कॅनल स्टेनोसिस म्हणजे मणक्याची होणारी झिज आहे. यावर उपचार बहुतांशवेळा फिजोथेरीपीने केली जाते. स्टेनोसिस जास्त वाढत असेल तर रुग्णाचा नियमित कामात क्लाउडीकेशन पेन (वेदना) पायात जास्त होत असेल तर त्यास शस्त्रक्रिया करावी, असा सल्ला दिला जातो. जाते. शस्त्रक्रिया काही लक्षणावर अवलंबून नाही. एखादा व्यक्ती चाललाच नाही व त्याची उपजीविका चालण्यावर, काम केल्यावरच होत असेल तर त्या रुग्णालाच आम्ही शस्त्रक्रिया लवकर करून घेण्याचा सल्ला देतो. ज्यांचे कार्यालयात बैठे काम आहे. तो दुकानदार आहे. त्यांना चालणे गरजेचे नाही, त्यांना सहसा शस्त्रक्रिया करायला सांगत नाही. त्यांना व्यायाम, योगा, प्राणायम करायला सांगतो.

कोणाला उपचार लवकर करावा लागतो

स्पेसिफिक कंबरदुखी लवकर निदान करून उपचाराची गरज असते. वय २० पेक्षा कमी व पन्नाशीपेक्षा जास्त असेल अशाना जर पाठीत (कंबरेत नव्हे) जास्त दुखायला लागले. तर लवकर डॉक्टरला दाखवावे, जर रुग्णाला जुना आजार असेल त्यात कॅन्सर, टीबीचे मागे औषधी चालू झाली असेल तर या रुग्णांनी त्वरित डॉक्टरला भेटून पुढील उपचार करावेत.

(एलएमएस जोड)

Web Title: Pain from the waist to the soles of the feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.