पलाश कृष्ण महेरोत्रा... चिंतनासोबत सामाजिक निरीक्षणाची सांगड घालणारे लेखक
By | Published: November 29, 2020 04:00 AM2020-11-29T04:00:02+5:302020-11-29T04:00:02+5:30
‘ युनक पार्क’ या पहिल्या पुस्तकातून आपण वावरत असलेल्या जगातील गौण विश्वात घेऊन जाणारे आणि ‘द बटरफ्लाय जेनरेशन’ ...
‘ युनक पार्क’ या पहिल्या पुस्तकातून आपण वावरत असलेल्या जगातील गौण विश्वात घेऊन जाणारे आणि ‘द बटरफ्लाय जेनरेशन’ या दुसऱ्या पुस्तकातून सहस्त्रकातील बिनधास्त तरुणाईचे भावविश्व शब्दचित्रांनी हुबेहूब उलगडून दाखविणारे लेखक पलाश कृष्णा मेहरोत्रा यांचा जन्म मुंबईतील.
‘युनक पार्क’ या त्यांच्या पहिल्याच साहित्यकृतीला शक्ती भट्ट पुरस्कार आणि काल्पनिक कथेसाठी द हिंदू पुरस्काराचे कोंदण लाभले. त्यांचे दुसरे पुस्तक ‘द बटरफ्लाय जेनरेशन’ पुस्तक क्रॉसवर्ड स्पर्धेतील फायनालिस्ट होते.
''रिसेसे'' आणि ''हाऊस स्पिरिट'' या दोन काव्यसंग्रहांचे त्यांनी संपादन केले आहे. ते मेल टुडे संडे, डेलीओल मेल ऑनलाईन इंडिया, कॅच न्यूज आणि मॅन्स वर्ल्डसाठी स्तंभलेखन करतात. दिल्लीतील स्टीफन्स कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी ऑक्सफर्डला गेले.
सर्वच राष्ट्रीय दैनिकांसह अनेक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांतून त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे. दुर्मीळ भारताचा शोध घेताना ते आपल्या लेखनात वैयक्तिक चिंतनाला सामाजिक निरीक्षणाची जोड देतात.
वाचकांशी व्हर्च्युअल माध्यमातून संवाद करताना ते म्हणाले की, सर्व प्रकारच्या साहित्याच्या वाचनातून एक दिशा मिळते. यातून तुम्हाला स्वत:चा आवाज गवसतो.
भारतीयांना कथा आणि कथालेखन आवडते. परंतु, कधीकधी आपण सामाजिक विषयावर भाष्य करताना सोयीस्करपणे साहित्यच विसरतो. भारताला लघुकथांची परंपरा आहे. परंतु, भारतीय इंग्रजी साहित्यात लघुकथांची वानवा आहे. माझे मन बेचैन होते आणि कथा मला आपोआप सुचतात.
नवलेखकांनी हे ध्यानात घेणे जरुरी आहे की, लेखन आणि प्रकाशन प्रपंचाची गती धीमी असते. तेव्हा यासाठी पुरेसा वेळ द्यायला हवाच.