पालेभाज्यांचे भाव कडाडले
By Admin | Published: May 2, 2016 11:53 PM2016-05-02T23:53:10+5:302016-05-03T00:02:37+5:30
लातूर : लातूरच्या बाजारपेठेत पालेभाज्यांची आवक कमी झाली असून, भावही कडाडले आहेत़ दुष्काळामुळे सर्वसामान्यांना पालेभाज्या खरेदी करणे अशक्य झाले आहे़
हिरवी मिरची ८० रुपये तर वांगे ६० रुपये किलो
लातूर : लातूरच्या बाजारपेठेत पालेभाज्यांची आवक कमी झाली असून, भावही कडाडले आहेत़ दुष्काळामुळे सर्वसामान्यांना पालेभाज्या खरेदी करणे अशक्य झाले आहे़ बाजारपेठेतील आवकच कमी झाल्याने भाव गगनाला भिडले आहेत़ बाजार समितीकडून निघालेल्या भावापेक्षा रयतू बाजारात या भाज्यांचे दर चढलेले आहेत़ हिरवी मिरची ८० रुपये तर वांगे ६० रुपये किलो दराने विकले जात आहेत़ यामुळे गृहिणींचे किचन बिघडले आहे़
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये भाज्यांची आवक कमी झाली आहे़ वांगे १५, भेंडी १८, पत्ता कोबी ३८, फुलकोबी ८, गावरान टमाटे १८, वैशाली टमाटे ३१, गवार शेंगा ३, पालक ७, शेवगा १५, गाजर १, भोपळा ६, कोथिंबीर १०, हिरवी मिरची ६०, वैशाली मिरजी ७, बटाटे १०़५०, लसून १००, कांदे ९६०, लिंबू ९, काकडी २१ टन आवक आहे़ आवक कमी असल्यामुळे या सर्व भाज्यांचे दर कडाडले आहेत़ वांग्याचा सरासरी भाव १० किलोसाठी ३०० रुपये आहे़ तर भेंडीचा २५० रुपये आहे़ हिरव्या मिरचीचा ५०० रुपये भाव आहे़ बाजार समितीच्या महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये निघालेला हा भाव असून, ग्राहकांना रयतू बाजारातील व्यापाऱ्यांकडून मोठ्या दराने पडतो़ हिरवी मिरचीचा भाव १० किलोसाठी ५०० रुपये असला तरी व्यापाऱ्यांकडून ग्राहकांना ८० रुपये दराने विकत घ्यावी लागत आहे़ (प्रतिनिधी)
बार्शी रोडवरील रयतू बाजारात ग्राहकांना वांगे ६० रुपये, भेंडी ४० रुपये, पत्ताकोबी ४० रुपये, गावरान टमाटे ३० रुपये, गवार शेंगा ४० रुपये, पालक पेंढी १५ रुपये, शेवगा ४० रुपये, भोपळा ४०, कोथिंबीर ८० रुपये, हिरवी मिरची ८० रुपये, वैशाली मिरची १२५ रुपये, बटाटे २० रुपये, आद्रक ६० रुपये, लसून ८० रुपये, कांदे २० रुपये, काकडी १० रुपये किलोप्रमाणे आहे़